महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; डेब्रिजमुळे परिसरात साचले सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 06:13 PM2021-08-11T18:13:27+5:302021-08-11T18:13:43+5:30
उल्हासनगरात तोडकाम झालेल्या इमारतीचे डेब्रिजमुळे परिसरात साचले सांडपाणी
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने पाडकाम कारवाई केलेल्या धोकादायक इमारतीचा डेब्रिज वेळीच उचलला नसल्याने, हेमराज डेअरी परिसरात दोन ते तीन फूट पावसाचे पाणी साचले. याप्रकारने नागरिकांचें आरोग्य धोक्यात आले असून नगरसेविका गीता साधवानी यांनी डेब्रिज उचलण्याची लेखी मागणी आयुक्तांकडे केली.
उल्हासनगर कॅम्प नं-५, हेमराज डेअरी परिसरातील धोकादायक सुरज नावाची इमारत महापालिकेने गेल्या महिन्यात निष्कसित केली. मात्र इमारतीचा डेब्रिज वेळीच उचलला नसल्याने, परिसरात पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली. तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. महापालिकेने इमारतीचे डेब्रिज त्वरित उचलण्याची मागणी स्थानिक नगरसेविका गीता साधवानी यांनी आयुक्तांकडे केल्यावर अतिक्रमण विभाग व आरोग्य विभागाला जाग आली.
डेब्रिज बाजूला हटवून पावसाचे साचलेल्या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र कालांतराने पाणी साचण्याचा प्रश्न जैसे थे राहणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. डेब्रिज उचलल्यास, पाणी साचण्याचा प्रश्न कायम मिटणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच डेब्रिजच्या शेजारी एक जेसीबी मशीन बंद असून ती हटविण्याचीही मागणी होत आहे.