साथीच्या रोगांमुळे उल्हासनगरात आरोग्य विभाग सतर्क, डॉक्टरांची तातडीची बैठक
By सदानंद नाईक | Published: July 27, 2022 03:28 PM2022-07-27T15:28:29+5:302022-07-27T15:29:01+5:30
शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया, व्हायरल ताप आदींच्या रुग्णांत वाढ झाल्याने, महापालिका आरोग्य विभाग सतर्ग झाला.
सदानंद नाईक
उल्हासनगर: व्हायरल ताप, सर्दी, खोकला, स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या रोगांमुळे महापालिका आरोग्य विभाग सतर्क होऊन, आठवड्याला रुग्णाबाबत अहवाल प्रसिद्ध करण्याचे आदेश आयुक्तांनी वैधकीय अधिकाऱ्यांना दिले. शहरातील डॉक्टरांची बैठक बोलावून त्यांच्याकडील रुग्णाची संख्या महापालिका आरोग्य विभागाला पाठविण्याचें आवाहन अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी केले.
उल्हासनगर शेजारील शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया, व्हायरल ताप आदींच्या रुग्णांत वाढ झाल्याने, महापालिका आरोग्य विभाग सतर्ग झाला. आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील विविध रुग्णांची नोंद होते की नाही. याबाबतची माहिती वैधकीय अधिकारी डॉ दिपक पगारे यांच्याकडून घेऊन, रुग्णांची दैनंदिन व साप्ताहिक आकडेवाडी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. रुग्णाच्या संख्येनुसार वैधकीय उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणाले. तसेच साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्याससाठी घर घर दस्तक व आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश यापूर्वीच अतिरिक्त आयुक्त जुईकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहे. तसेच डॉक्टर व खाजगी लॅबोरेटरी चालक यांची संयुक्त बैठक घेऊन रुग्णाची आकडे परस्पर प्रसिद्ध न करता, महालिकेकडे पाठविण्याचे सांगितले. त्यामुळे रुग्ण संख्या उघड होऊन, उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली.
महापालिका आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध करून, डॉक्टर, नर्स व वार्डबॉय तैनात करण्यात आले. त्यांच्याकडून दैनंदिन रुग्णाची नोंदणी केली जात आहे. याव्यतिरिक्त मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्ण संख्यावर लक्ष ठेवून डॉक्टरांना सतर्क राहून उपचार करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले. पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा लक्षात घेऊन पाणी उखळून थंड करून पिण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी देऊन, विभागवार पाण्याची चाचणी करण्यात येत आहे. महापालिकेचे वैधकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी गेल्या आठवड्यात एक संशयीत डेंग्यूचा रुग्ण मिळाला होता. मात्र त्याची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले. तसेच शहरात कोणत्याच साथीच्या रुग्णांची संख्या नसल्याचे ते म्हणाले.
महापालिका रुग्णलाय सुरु करण्याचे संकेत
महापालिकेने कोरोना काळात रिजेन्सी अंटेलिया येथे कोविड रुग्णलाय उभे केले. कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. दरम्यान कोरोनाची रुग्ण कमी झाल्याने, रुग्णालयाचे उदघाटन झाले नाही. मात्र नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी रुग्णलाय सुरू करण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जुईकर यांनी दिले आहे