परीक्षार्थींचे ‘आरोग्य’ बिघडले; हॉलतिकीट एकाचे, फोटो दुसऱ्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:04+5:302021-09-25T04:44:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : लिपिक, चालक, परिचारिका, शिपाई, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आदी अ, ब, क, ड गटांमधील विविध ...

The ‘health’ of the examinees deteriorated; Holtkit one, photo another | परीक्षार्थींचे ‘आरोग्य’ बिघडले; हॉलतिकीट एकाचे, फोटो दुसऱ्याचा

परीक्षार्थींचे ‘आरोग्य’ बिघडले; हॉलतिकीट एकाचे, फोटो दुसऱ्याचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : लिपिक, चालक, परिचारिका, शिपाई, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आदी अ, ब, क, ड गटांमधील विविध पदांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षा राज्यभर दोन दिवसांच्या कालावधीत पार पडत आहेत. शनिवार-रविवार या दोन दिवसांच्या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या परीक्षार्थींना मिळालेल्या हॉल तिकिटांमध्ये विविध चुका आहेत. यामध्ये कोणाचे नाव चुकले, तर कोणाचा फोटो बदलला आहे, काहींना जवळच्या परीक्षा केंद्रांऐवजी लांबचे परीक्षा केंद्र आदी विविध समस्या ऐकायला मिळत आहेत. यामुळे या आरोग्याच्या परीक्षार्थींचे मात्र आरोग्य बिघडल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ३० परीक्षा केंद्रांवर तब्बल ५४ हजार परीक्षार्थी या आरोग्य सेवेच्या परीक्षेला बसलेले आहेत. त्यांच्या या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ३०० पेक्षा जास्त मनुष्यबळ परीक्षा केंद्रांवर तैनात केले आहे. याशिवाय पोलीस यंत्रणाही तैनात आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी परीक्षार्थींना जवळच्या परीक्षा केंद्रांऐवजी लांबच्या शहरातील केंद्रांवर परीक्षा द्यावी लागत आहे. या केंद्रांवर वेळेत पोहोचण्याच्या दृष्टीने या परीक्षार्थींनी काही ठिकाणी एक दिवस आधीच केंद्राजवळच्या परिसरात मुक्काम ठोकला आहे. वाहतूककोंडी आणि वेळेवर वाहन व्यवस्थेच्या समस्येला तोंड देण्याऐवजी काही परीक्षार्थींना आधीच ठिकठिकाणच्या शहरांमध्ये एक दिवस आधी जावे लागले आहे.

-------

१) जिल्ह्यातील एकूण केंद्रे - ३०

२) परीक्षार्थी - ५४,०००

३) हॉल तिकिटांवर चुकाच चुका!

- नावात चूक केल्याच्या तक्रारीसह फोटोही दुसऱ्याचा लागलेले हॉल तिकीट. पत्त्यातील काही बदल झाल्यामुळे हॉल तिकीट मिळण्यास विलंब. काही परीक्षार्थींना कॉल लेटर मिळालेले नाही.

४) तीन सत्रांत परीक्षा - विविध पदांसाठी असलेल्या या परीक्षा तीन सत्रांत घेतल्या जात आहेत. सामान्य ज्ञानासह गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर आधारित प्रश्न, बुद्धी कौशल्यावर आधारित प्रश्नावली आदी विषयांची परीक्षा तीन सत्रांत घेतली जात आहे.

.........

५) परीक्षार्थी चिंतित!

१) आरोग्य विभागाच्या वाहन चालक पदासाठी मी परीक्षा देत आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा अंजूर येथील रहिवासी असून, मला डोंबिवली येथे परीक्षा केंद्र मिळाले आहे. माझ्या हॉलतिकिटामध्ये फारशा चुका आढळलेल्या नाहीत.

- मयूर पाटील

दिवे अंजूर, परीक्षार्थी

..........

२) माझी परीक्षा कांदिवली येथील परीक्षा केंद्रावर आहे. मी कल्याणला राहायला असल्यामुळे मला ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळायला हवे होते. पण, आता मला १२ वाजेच्या काही तास आधीच कांदिवली गाठावी लागणार आहे. गट ‘क’ मधील पदांसाठी मी परीक्षा देत असून, रविवारी परीक्षा आहे.

- आशिष कासार, परीक्षार्थी, कल्याण.

.........

३) चुका आढळल्यास परीक्षार्थींनी काय करावे?

- या परीक्षेच्या हॉल तिकिटावर चुका असल्याच्या फारशा तक्रारी मला ऐकायला मिळालेल्या नाहीत. पण, तसे काही असल्यास प्रशासनाकडून ठिकठिकाणी योग्य तो निर्णय सोयीनुसार घेतला जाईल. परीक्षा केंद्रांवर ३०० अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत.

- डॉ. कैलाश पवार,

जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

--

Web Title: The ‘health’ of the examinees deteriorated; Holtkit one, photo another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.