महादहीहंडीऐवजी आरोग्य उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:27+5:302021-09-02T05:26:27+5:30
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीसारखे गर्दी जमवणारे उत्सव यावर्षीही साजरे न करता साधेपणाने करावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीसारखे गर्दी जमवणारे उत्सव यावर्षीही साजरे न करता साधेपणाने करावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जांभळीनाका येथे साजरा होणारा महादहीहंडी उत्सव यावर्षीही साजरा न करता त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महादहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदाचे उत्सवाचे १९ वे वर्ष होते. आरोग्य शिबिराचे आयोजन आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे महापालिका व डॉ. उमेश आलेगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मा दान, ॲंन्टिजन टेस्टचे आयोजन केले होते.
------------------------------
ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण मिळावे यासाठी वसंतविहार परिसरात महापौर नरेश म्हस्के यांच्या महापौर निधीतून व स्थानिक नगरसेविका जयश्री डेव्हिड यांच्या प्रयत्नाने ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. लवकरच हा कट्टा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असे म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.