उल्हासनगर महापालिकेला कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबाबत हेल्थकेअर हिरो ऑफ इंडिया पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 06:21 PM2021-08-12T18:21:18+5:302021-08-12T18:21:38+5:30
उल्हासनगर महापालिकेने कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याने, रुग्णाची संख्या वाढली नाही.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्या प्रकरणी महापालिकेला मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड यांच्या वतीने यावर्षीचा हेल्थकेअर हिरो ऑफ इंडिया हा पुरस्कार दिला. महापौर लिलाबाई अशान, अतिरिक आयुक्त करुणा जुईकर, वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी सदर पुरस्कार महापौर दालनात स्वीकारला आहे.
उल्हासनगर महापालिकेने कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याने, रुग्णाची संख्या वाढली नाही. तसेच मृत्युदर कमी आहे. याची दखल मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड (सीएसआर) यांच्या द्वारे घेण्यात येऊन यावर्षीचा हेल्थकेअर हिरो ऑफ इंडिया या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार देण्याच्या पॅनल मध्ये डॉ रघुनाथ अनंत माशेलकर, आयुष्मान भारतचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदू भूषण आणि सिप्ला फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रुमाना हमीद होत्या. त्यांनी राज्यातील महापालिकेच्या कोविड काळातील उत्कृष्ट कामाची पाहणी करून उल्हासनगर महापालिकेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोविडच्या कारणाने महापालिकेत महापौर लिलाबाई अशान, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे आदींच्या उपस्थित दिला.
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसतांना, शासनाचे शासकीय प्रसूतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच शांतीनगर येथील साई प्लॅटिनियम हे खाजगी रुग्णालय भाड्याने घेऊन कोरोना रुग्णावर उपचार केले. तसेच स्वतःचे रिजेन्सी अंटेलिया येथे २०० बेडचे रुग्णालय उभे करण्यात येत आहे. रुग्णावर उपचार होण्यासाठी महापालिकेने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदींची तात्पुरत्या स्वरूपात भरती केली. तसेच महापालिकेची आरोग्य सेवा निरंतर सुरू राहण्यासाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी हवे. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.