सेंट्रल पार्क जमिनीसाठी आज सुनावणी

By admin | Published: January 11, 2016 01:53 AM2016-01-11T01:53:44+5:302016-01-11T01:53:44+5:30

पालिकेच्या सेंट्रल पार्कसाठी अधिकृत नामोल्लेख होत असलेल्या सुमारे १८ एकर जागेवर दोन खाजगी विकासकांना बांधकाम परवानगी दिली. ती जमीन शासकीय असल्याचे जिल्हा प्रशासनाला प्राप्त

Hearing the land of Central Park today | सेंट्रल पार्क जमिनीसाठी आज सुनावणी

सेंट्रल पार्क जमिनीसाठी आज सुनावणी

Next

राजू काळे, भार्इंदर
पालिकेच्या सेंट्रल पार्कसाठी अधिकृत नामोल्लेख होत असलेल्या सुमारे १८ एकर जागेवर दोन खाजगी विकासकांना बांधकाम परवानगी दिली. ती जमीन शासकीय असल्याचे जिल्हा प्रशासनाला प्राप्त तक्रारीवरून निदर्शनास आले. यासंदर्भात जिल्हा उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर ११ जानेवारीला सुनावणी होणार असून त्यासाठी ३५ व्यक्तींना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
जुन्या एक्झिस्टिंग लॅण्ड युज (ईएलयू) प्रमाणे ही जागा सुमारे ३० एकरहून अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असून सध्या ती सुमारे १८ एकरवर अस्तित्वात राहिली आहे. ४७ वर्षांपूवी ही जागा सरकारी नसून ती जोजेफ फर्नांडिस या व्यक्तीच्या नावे असल्याची नोंद २० जुलै १९९८ च्या फेरफारमध्ये आहे. अशा अनेक व्यक्तींसह दी इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि.च्या नावे जमिनीचा मालकी हक्क फेरफारमध्ये दाखविण्यात आला आहे. सध्या त्या जागेच्या सातबाऱ्यातील नोंदी अनेकांच्या नावांवरून आर.एन.ए. कॉर्प प्रा.लि.च्या नावे स्थिरावल्या आहे. या जमिनीचा विकास विरारकर कंपनीतील बड्या असामीच्या मध्यस्थीने मार्गी लागला असतानाच फेरफारमधील १७ जानेवारी १९५३ च्या नोंदीनुसार ती शासकीय बिनआकारी पडीक आहे. त्यावर होणारा खाजगी विकास बेकायदेशीर असल्याची तक्रार शिवाजी माळी यांनी सरकारी पोर्टलवर अनुक्रमे २८ आॅक्टोबर व ९ नोव्हेंबरला दाखल केली होती. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयामार्फत घेतली असून अहवाल सादर करण्यात आला आहे.

Web Title: Hearing the land of Central Park today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.