मनसे पदाधिकाऱ्यांच्या जामिनावर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:34 AM2018-05-15T06:34:46+5:302018-05-15T06:34:46+5:30

शीळफाटा येथे सुरू असलेले बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाºया मनसे पदाधिकाºयांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणारी सुनावणी एक दिवस पुढे गेली असून, ती मंगळवारी होणार आहे.

Hearing on MNS office bearers today | मनसे पदाधिकाऱ्यांच्या जामिनावर आज सुनावणी

मनसे पदाधिकाऱ्यांच्या जामिनावर आज सुनावणी

Next

ठाणे : शीळफाटा येथे सुरू असलेले बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाºया मनसे पदाधिकाºयांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणारी सुनावणी एक दिवस पुढे गेली असून, ती मंगळवारी होणार आहे.
गेल्या आठवड्यात शीळफाटा येथे सुरू असलेले बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाºया रवींद्र मोरे, संदीप पाचंगे, पुष्कर विचारे, सागर जेधे, विनायक रणपिसे, जनार्दन खरिवले, शरद पाटील, कुशाल पाटील या आठ मनसे पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवार, ८ मे रोजी अटक केली. त्यानंतर, ९ मे रोजी त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ११ मे रोजी त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले आणि कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर, त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल, असे सांगण्यात आले होते, परंतु आज पोलिसांचे म्हणणे न आल्याने ती उद्यावर गेली असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. दरम्यान मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले, चारही बाजूने दबावतंत्राचा वापर सुरू आहे. क्षुल्लक कारणास्तव तारीख दिली जात असल्याने न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे.

Web Title: Hearing on MNS office bearers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे