मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावरील हरकती सूचनांवर फेब्रुवारीत २ टप्प्यात होणार सुनावणी

By धीरज परब | Published: January 30, 2023 01:36 PM2023-01-30T13:36:23+5:302023-01-30T13:36:39+5:30

मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर फेब्रुवारी महिन्यात २ टप्प्यात भाईंदर येथील महापालिका मुख्यालयात सुनावणी होणार आहे. 

Hearing on the objection notices on the revised development plan of Mira Bhayander city will be held in 2 phases in February. | मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावरील हरकती सूचनांवर फेब्रुवारीत २ टप्प्यात होणार सुनावणी

मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावरील हरकती सूचनांवर फेब्रुवारीत २ टप्प्यात होणार सुनावणी

googlenewsNext

मीरारोड -

मीरा भाईंदर शहराच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर फेब्रुवारी महिन्यात २ टप्प्यात भाईंदर येथील महापालिका मुख्यालयात सुनावणी होणार आहे. 

मीरा भाईंदर शहराचा प्रारूप सुधारित विकास आराखडा आधी आरखडा फुटीने वादग्रस्त ठरला . नंतर  पालिके कडून काम काढून घेऊन ते ठाणे जिल्ह्याच्या नगररचना सहायक संचालक यांच्या कडे देण्यात आले होते . विविध कारणांनी विलंब झालेला प्रारूप आराखडा २८ ऑक्टोबर रोजी हरकती - सूचनांसाठी जाहीर केला होता.  

सहायक संचालक किशोर पाटील यांनी जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्यावर हरकती - सूचनां साठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती . सदर प्रारूप आराखड्यावर देखील अस्तित्वातील रस्ते न दर्शवणे , आरक्षण कमी करणे , हरित पट्टा कमी करणे , काही राजकीय कम विकासकांना फायदा पोहचवणे आदी स्वरूपाचे आरोप सुद्धा झाले. तर मीरा भाईंदर महापालिकेत ३०५१  ;  ठाणे सहायक संचालक कार्यालयात २ हजार १५८  तर कोकण भवन येथील नगररचना सह संचालक यांच्या कार्यालयात ५३ अश्या एकूण ५ हजार २६२ हरकती व सूचना आल्या आहेत. 

आलेल्या हरकतींची छाननी केली असता त्यात अनेक हरकती एकसारख्या व दोनवेळा केलेल्या असल्याने प्रत्यक्षात त्याची संख्या कमी झाली आहे . हरकती सूचनांवर कार्यवाही साठी ४ सदस्यांची नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे . आता आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी  संबंधित अर्जदारांना नोटिसा बजावण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवण्यात आली आहे. पालिकेने सुनावणीसाठी नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. 

दोन टप्प्यात सुनावणी होणार आहे . ८ व  ९ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात तर १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान दुसऱ्या टप्प्यात मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर येथील मुख्यालयातल्या दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृहात सुनावणी घेतली जाणार आहे . सुनावणी झाल्यावर आलेल्या हरकती - सूचना व मुद्द्यांची माहिती राज्य शासना कडे अहवालासह सादर केली जाईल . शासना कडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाऊन अंतिम सुधारित विकास आराखडा मंजूर करून तो प्रसिद्ध केला जाणार आहे. 

Web Title: Hearing on the objection notices on the revised development plan of Mira Bhayander city will be held in 2 phases in February.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.