कारखानदारांच्या याचिकेवर २२ रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2016 04:34 AM2016-08-20T04:34:54+5:302016-08-20T04:34:54+5:30

रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याच्या नोटिशीवर आता २२ आॅगस्टला सुनावणी होणार आहे.

Hearing on the petition of the industrialists on 22 | कारखानदारांच्या याचिकेवर २२ रोजी सुनावणी

कारखानदारांच्या याचिकेवर २२ रोजी सुनावणी

Next

डोंबिवली : रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याच्या नोटिशीवर आता २२ आॅगस्टला सुनावणी होणार आहे.
नोटिशीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी कारखानदारांनी राष्ट्रीय हरीत लवादाकडे धाव घेतली होती. त्याची सुनावणी शुक्रवारी होणार होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वकील अनुपस्थित असल्याने लवादाने ती २२ पर्यंत पुढे ढकलली.
लवादाकडे ‘वनशक्ती’ संस्थेच्या याचिकेवर २०१३ पासून सुनावणी सुरू आहे. लवादाने वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळासह यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी केली आाहे. लवादाने दणक्याननंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ कारखाने बंद करण्याची नोटिस २ जुलैला दिली होती. (प्रतिनिधी)

‘अंबरनाथ सांडपाणी केंद्रप्रकरणी म्हणणे मांडा ’
अंबरनाथचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र एमआयडीसीने खाजगी कंत्राटदारास चालवण्यास दिले होते. कंत्राटदारने सांडपाणी प्रक्रिया केंद्रच बँकेकडे तारण ठेवून कर्जाची रक्कम लाटल्याचे चौकशीत समोर आले. या केंद्रप्रकरणी एमआयडीसीने म्हणणे मांडावे, असे लवादाने सूचित केले. डोंबिवलीचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र कारखानदार चालवत असल्याने त्यावर लवादाने कोणतेही भाष्य केले नाही, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी दिली.

Web Title: Hearing on the petition of the industrialists on 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.