मन हेलावून टाकणारी घटना, कोरोना संशयीत वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:51 PM2020-05-23T20:51:21+5:302020-05-23T20:51:42+5:30

महापलिकेची रुग्णवाहिका आली आणि निघून गेली

A heartbreaking incident, Kovid suspected elderly reptile descending from the fourth floor kalyan MMG | मन हेलावून टाकणारी घटना, कोरोना संशयीत वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन खाली

मन हेलावून टाकणारी घटना, कोरोना संशयीत वयोवृद्ध सरपटत चौथ्या मजल्यावरुन खाली

googlenewsNext

कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका नसल्याने रुग्णलयात चालत येण्याचा सल्ला दिल्याची घटना ताजी असताना आज सायंकाली कल्याण पूव्रेतील कोरोना संशयीत वृद्ध चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आले. मात्र ते आल्यानंतर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका त्यांची निघून गेली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना पाहून मन हेलावून जाईल. यावरुन कल्याण डोंबिवली महापालिकेचा कोरोना रुग्णाची किती काळजी आहे ही बाब उघड झाली आहे.

कल्याण पूव्रेतील हनुमाननगरातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते एका चार मजली इमारतीत राहतात. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्या घरातील त्यांचे 71 वर्षीय वडील व आई हे दोघे कोरोना संशयित रुग्ण आहेत. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मुलांनी फोन केला. या दोन्ही वृद्धाना घेण्यासाठी रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली. दरम्यान या दोन्ही वयोवृद्धांना चालण्याचा त्रस असल्याने ते दोघेही चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आहे. ते खाली आल्यावर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून घेली होती. रुग्णवाहिकेच्या चालकने थांबण्यास नकार दिला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. घटनेचे कथन त्यांच्या मुलांनी व्हीडीओत केले आहे. महापालिकेकडे 33 रुग्णवाहिका आहे. त्यापैकी काही रुग्णवाहिका महापालिकेच्या आहे. बहुतांशी रुग्णवाहिका या भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या आहेत. रुग्णवाहिका चालकाना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत. त्याना सोयी सुविधा दिलेल्या नाही. खाजगी रुग्णवाहिकांवर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्याचाच फटका या वयोवृद्धांना बसला आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्या दोन कोरोना संशयित वृद्धाना घेण्यासाठी रुग्णवाहिका गेली होती. मात्र रुग्णवाहिका चालकाचा उपवास होता. उपवास सोडण्याची वेळ सायंकाळी सात वाजता होती. त्यामुळे रुग्णवाहिका चालक उपास सोडण्यास गेला. त्यामुळे वृद्धांची गैरसोय झालेली आहे हे मान्य केले.

Web Title: A heartbreaking incident, Kovid suspected elderly reptile descending from the fourth floor kalyan MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.