जिल्ह्यात दीड दिवसांच्या ३८ हजार ३७३ बाप्पांना भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:28+5:302021-09-12T04:46:28+5:30
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गणरायाचे आगमन झाल्यानंतर शनिवारी दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला कोरोनाचे नियम पाळून आणि कोरोनामुक्तीचा ...
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गणरायाचे आगमन झाल्यानंतर शनिवारी दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला कोरोनाचे नियम पाळून आणि कोरोनामुक्तीचा गजर देऊन भक्तिभावाने आणि साश्रुननांनी निरोप दिला. ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात ३८ हजार ३७३ बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात असताना गणरायाचे आगमन झाले. त्यातही गणोशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करावा, असे सांगून शासनाने मिरवणुकीसह निर्बंध घातले. त्यानुसार शनिवारी अगदी साध्या पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ठाणे महापालिकेने विसर्जनासाठी ऑनलाईन बुकिंग स्लॉट तयार केले होते. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी गणेश मूर्ती स्वीकृती केंद्र स्थापन केले होते. त्यानुसार भक्तांची कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन न करता आपल्या लाडक्या बाप्पाला विधिवत आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र होवो, अशा भावना व्यक्त करून निरोप दिला. शहरात ९ प्रभाग समितीनिहाय फिरती विसर्जन व्यवस्थाही केली होती, तर विसर्जनाच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थाही होती.
ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, मीराभाईंदर, उल्हानगर, भिवंडी, अंबरनाथ बदलापूर या भागातही बाप्पांना साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.
परिमंडळ - सार्वजनिक - घरगुती
ठाणे शहर - ०० - ५१९१
भिवंडी - ० १ - ३१४५
कल्याण - ४१ - १२४०५
उल्हासनगर - ०२ - ९३५५
वागळे इस्टेट - ३६ - ८१९७
एकूण - ८० - ३८२९३