कल्याणमधील मेळा गणपतींना भावपूर्ण निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 02:22 AM2020-08-30T02:22:30+5:302020-08-30T02:22:50+5:30
कोरोना संकटकाळात राज्य सरकार आणि पोलीस यांनी आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत प्रत्येक मंडळाने केवळ चार पदाधिकारी सोबत घेऊन गाडीने गणपती थेट कल्याण खाडीजवळील विसर्जनस्थळी नेले.
कल्याण : शहरातील १२ मेळा गणपती मंडळांच्या गणपतींचे शनिवारी एकादशीच्या दिवशी साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोना संकटकाळात राज्य सरकार आणि पोलीस यांनी आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत प्रत्येक मंडळाने केवळ चार पदाधिकारी सोबत घेऊन गाडीने गणपती थेट कल्याण खाडीजवळील विसर्जनस्थळी नेले. अत्यंत साध्या पद्धतीने या गणपतींचे विसर्जन केल्याची माहिती पराग तेली यांनी दिली आहे.
मेळ्याच्या गणपतींची संख्या यापूर्वी ३५ होती. कालांतराने मेळा गणपती मंडळांच्या संख्येत घट झाली. प्रत्येक ज्ञाती समाजाचा एक गणपती, असा या मेळा गणपतीचा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून मेळा गणपतींची परंपरा सुरू आहे. सगळ्यात आधी तेली समाजाच्या मेळा गणपती मंडळाला मान दिला जातो. या परंपरेनुसार शनिवारीही तेली समाजाचा गणपती सगळ्यात आधी विसर्जनासाठी निघाला. १२ गणपतींचे विसर्जन अवघ्या दोन तासांत करण्यात आले.