वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:49 AM2019-11-22T00:49:22+5:302019-11-22T00:49:27+5:30

कारवाईची प्रकरणे ८२ हजारांनी वाढली, अपघाताच्या प्रमुख कारणांकडे ठाणे शहर वाहतूक पोलिसांचे लक्ष

Heavy action against those who break traffic rules | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा

Next

ठाणे : शहर पोलीस आयुक्तालयातील वाढत्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी जी मुख्य कारणे आहेत, त्याकडेच ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी लक्ष देत, त्यानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा केलेल्या कारवाईची आकडेवारी तब्बल ८१ हजार ८३७ अशी वाढली आहे. त्यामुळे यंदा अपघातांची संख्याही घटल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पाच परिमंडळे असून त्याअंतर्गत एकूण १८ उपशाखा आहेत. मध्यंतरी अपघातांचे प्रमाण वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने अपघात कमी करण्यासाठी जिल्हास्तरावर विविध शासकीय यंत्रणांची समिती स्थापन करण्यास सांगून जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगितले. अपघात कमी करण्याचे आदेश देत, त्याचा आढावा घेण्यासही न्यायालयाने सांगितले होते.

शहर वाहतूक शाखेने अपघातांची प्रमुख कारणे असलेल्या रॅश ड्रायव्हिंग, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, विनासेफ्टीबेल्ट, विनाहेल्मेट आणि दारू पिऊन गाडी चालणे अशा प्रकारच्या कारवाईकडे लक्ष केंद्रित करत, त्यानुसार २०१८ मध्ये रॅश ड्रायव्हिंगच्या दोन हजार ३०१ केस नोंदवल्यावर त्यामध्ये यंदा १२ हजार ६२९ ने वाढ झाली आहे. विनाहेल्मेटच्या गत वर्षात नऊ हजार १२० के सेस केल्या होत्या. त्यामध्ये यंदा ३३ हजार ९९९ ने वाढ झाली आहे. विनासेफ्टीबेल्टच्या केसेसमध्ये यावर्षी वाढ झाली नसली तरी, यंदा त्या केसेसही १५ हजार ७८ इतक्या असून मोबाइलवर बोलत गाडी चालवण्याच्याही नऊ हजार ५२ केसेस करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मद्यप्राशन करत गाडी चालवणाºया सात हजार ३७० जणांवर कारवाई केली आहे.

गतवर्षात जानेवारी ते आॅक्टोबरदरम्यान वाहतूक पोलिसांनी पाच लाख ७६ हजार ७८४ केसेस केल्या आहेत. या वर्षी अशा के सेसची आकडेवारी सहा लाख ५८ हजार ६२१ एवढी आहे. म्हणजे ८१ हजार ८३७ ने केसेसचे प्रमाण वाढल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.

53000 केसेस आॅक्टोबर महिन्यात
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाºयांवर सहा लाख ५८ हजार ६२१ केसेस अवघ्या १० महिन्यांत शहर वाहतूक पोलिसांनी नोंदवल्या आहेत. आॅक्टोबरमध्ये त्यापैकी ५२ हजार ९७० इतक्या केसेस नोंदवल्या आहेत. यामध्ये रॅश ड्रायव्हिंगच्या बाराशे, विनासेफ्टी बेल्टच्या ७४१, विनाहेल्मेटच्या चार हजार ४२४, तर मोबाइलवर बोलत गाडी चालवणाºया ५४२ जणांवर कारवाई केली असून ३६६ मद्यपींवरही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रॅश ड्रायव्हिंग 1200
विनासेफ्टी बेल्ट 741
विनाहेल्मेटच्या 4424
मोबाइलवर बोलत ड्रायव्हिंग 542
मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग 366

2018 मधील रॅश ड्रायव्हिंगच्या 2,301 केस नोंदवल्या.
2019 मध्ये यात 12,629 ने वाढ झाली आहे.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याची प्रमुख कारणे असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण यंदा घटले आहे.
- अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर

Web Title: Heavy action against those who break traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.