ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:32 PM2024-10-02T18:32:21+5:302024-10-02T18:34:01+5:30
वेंकटरमना चिप्स लिमिटेड असे या चिप्स बनवणाऱ्या कंपनीचे नाव सांगण्यात येत आहे.
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वेंकटरमना चिप्स लिमिटेड असे या चिप्स बनवणाऱ्या कंपनीचे नाव सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी कटरमना चिप्स लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर येथील असलेले गॅस सिलिंडर फुटल्याचे आवाज ऐकू आले. दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तसेच, कंपनी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु pic.twitter.com/XJmYztiTbP
— Lokmat (@lokmat) October 2, 2024
अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मीरा रोड, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण शहरातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेचं गांभीर्य ओळखून आणि संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी आगीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे. तसेच विद्युत लाईन देखील बंद ठेवण्यात आली आहे.