मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:04 AM2017-08-30T01:04:29+5:302017-08-30T01:04:39+5:30
दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले.
ठाणे : दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत २५ हजारांहून अधिक तर ग्रामीण भागांत सात हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन झाले. पावसामुळे मात्र विसर्जनासाठी भाविक एरव्हीपेक्षा उशीरा निघाले होते. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र गौरींचे उत्साहात आगमन झाले.
शनिवारी दीड आणि रविवारी तीन दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. तर दुसरीकडे गौराईचे आगमन झाले. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत आणि ग्रामीण भागात ३२ हजार ४०७ बाप्पाचे विसर्जन झाले. पावसामुळे भाविक लवकरात लवकर विसर्जन करण्याच्या धावपळीत होते. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ६४ सार्वजनिक; तर खाजगी २५ हजार २१६ बाप्पांना निरोप दिला. यात परिमंडळ एकमध्ये सार्वजनिक ९ तर खाजगी ५८९५, परिमंडळ ३ मध्ये सार्वजनिक २४ तर खाजी ७३३५, परिमंडळ ४ मध्ये सार्वजनिक २२ तर खाजगी ६९४०, परिमंडळ ५ मध्ये सार्वजनिक ९ तर खाजगी ५०४६ तसेच, ग्रामीण भागांत सार्वजनिक २२७ तर खाजगी ६९०० बाप्पांचे विसर्जन झाले. वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव, उपवन तलाव, निळकंठ वुडस टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे व खारेगांव या ठिकाणी कृत्रिम तलावांत विसर्जन झाले. मडवी हाऊस, पोखरण रोड नं. २ येथे वसंतविहार संकुल प्रवेशद्वार, वागळे इस्टेट रोड नं.१६, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, खिडकाळी, उपवन तलाव आदी ठिकाणी उभारलेल्या श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्रालादेखील भाविकांनी प्रतिसाद दिला.