भिवंडीत मुसळधार पावसाने झोडपले; मनपाचा आपत्कालीन विभाग सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:33 PM2021-07-19T22:33:19+5:302021-07-19T22:33:36+5:30

घरात पाणी शिरलेल्या नागरिकांसाठी मनपाची कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांचा मनपा विरोधात तीव्र संताप

Heavy rain, flood water in Bhiwandi; no service from Corporation | भिवंडीत मुसळधार पावसाने झोडपले; मनपाचा आपत्कालीन विभाग सुस्त

भिवंडीत मुसळधार पावसाने झोडपले; मनपाचा आपत्कालीन विभाग सुस्त

Next

 

नितिन पंडीत

भिवंडी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळ पासून भिवंडी शहर व ग्रामीण भागात सुरू झालेले मुसळधार पावसाची संततधार सोमवारीही कायम राहिल्याने रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील शिवाजी चौक, ब्राह्मण आळी, अंबिकानगर ,कासार आळी,कमला हॉटेल, ईदगाह या नागरी वस्तीत सुमारे तीन फुटा पेक्षा अधिक पाणी साचल्याने नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

          तीनबत्ती भाजी मार्केट मध्ये पाणी शिरल्याने सकाळ पासूनच भाजी मार्केट बंद पडले होते तर अनेक विक्रेत्यांनी आपल्या कडील भाजीपाला पाण्यात फेकून दिला होता .शहरातील अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरीकांना आपल्या कडील अत्यावश्यक साहित्य वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती .

            तर शहरातील ईदगाह या परिसरातील खाडी लगत असलेल्या झोपडीपट्टी मधील सुमारे ५०० हुन अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते ,तर येथील रस्त्यावर सुध्दा सुमारे चार फुटा हुन ही अधिक पाणी साचल्याने घरात अडकून पडलेल्या लहानग्यांसह पाळलेल्या बकरी बोकड यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्या साठीप होडीचा सहारा घ्यावा लागत होता . येथील नागरीकांना दुपारचे जेवण बनविण्यासाठी सुध्दा घरात जागा नसल्याने या नागरीकां वर उपाशी राहण्याची वेळ आली होती . परंतु या सर्व परिस्थितीत पालिका आपत्कालीन यंत्रणा सुस्त असल्याने कोणत्याच ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पालिका कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आली नाही. तर मनपा प्रशासना विरोधात इडगा रोड परिसरात घरात पाणी शिरलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. 

Web Title: Heavy rain, flood water in Bhiwandi; no service from Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस