सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी; सखल भागात साचले पाणी, वाहतूक कोंडीत पडली भर
By अजित मांडके | Published: September 8, 2022 07:11 PM2022-09-08T19:11:14+5:302022-09-08T19:11:28+5:30
शहरातील बहुतेक भागात वाहतूक कोंडी जाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मागील काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाने बुधवारी नंतर गुरवारी देखील संदयकाली जोरदार हजेरी लावली. ५.३० च्या सुमारास विजेच्या कडकडांटसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. अचानक अंधार मोठय़ा प्रमाणात वाढला आणि जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तर शहरातील बहुतेक भागात वाहतूक कोंडी जाली होती.
गुरुवारी सायंकाळी ५ नंतर सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील नौपाडा, गोखले रोड, वंदना बसथांबा, लोकमान्यनगर या भागात गुडघाभर पाणी साचले होते. लोकमान्य नगर येथील एका रस्त्याला नदीचे रुप आले होते. तर, नौपाडा येथील सखल भागातील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही फटका बसला.
अचानक झालेल्या पावसामुळे कामाहून घरी परतणाऱ्या नोकदारांचीही तारांबळ उडाली. शहरात ठाणे बेलापूर मार्गावर कळवा ते विटावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड टोलनाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच घोडबंदरसह शहरातील अंतर्गत मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांना वेळेत घरी पोहचता आले नाही.