भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी  

By नितीन पंडित | Published: July 25, 2024 05:21 PM2024-07-25T17:21:23+5:302024-07-25T17:22:54+5:30

या सर्वांचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होऊन शहरातील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती...

Heavy rain in Bhiwandi caused waterlogging in many low-lying areas   | भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी  

भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी  

भिवंडी: शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून पावसाचा जोर वाढवल्यानंतर भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट, कल्याण नाका, देवजी नगर,पटेल नगर,तांडेल मोहल्ला,कल्याण नाका,कमला हॉटेल आदी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तीनबत्ती, भाजी मार्केट या ठिकाणी तब्बल दोन फूट पाणी साचल्याने येथील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. या सर्वांचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होऊन शहरातील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती.

भिवंडी ठाणे या जुन्या रस्त्यावरील कशेळी काल्हेर या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या रस्त्यावर सुमारे दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने असंख्य वाहनांचा वेग मंदावला असून यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना वाहने चालवावी लागत आहेत त्यामुळे अनेक दुचाकी वाहने या पाण्यातून जात असल्याने बंद पडली होती, त्यामुळे दुचाकी चालकांना वाहने पाण्याबाहेर काढून त्यांना सुरू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

तीन बत्ती परिसरात रस्त्यावर गुडघाभर लांनी साचले होते.याठिकाणी असलेल्या नाल्यावरची झाकणे पंतांच्या प्रवाहात वाहून गेल्याने नाल्याचे पाणी प्रचंड वेगाने रस्त्यावर आले होते.मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना सकळी सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थी महिला व नागरिकांनी तीन बत्ती परिसरातून वाट काढण्यासाठी रस्सी बांधण्यात आली होती जिच्या साहाय्याने नागरिकांनी येथील रस्ता ओलांडला.तर मुसळधार पावसाने येथील अनेक दुकांनामध्ये पाणी साचले होते.साचलेले पाणी दुकानातून बाहेर काढण्यासाठी दुकानदारांची मोठी कसरत होत होती.
 

Web Title: Heavy rain in Bhiwandi caused waterlogging in many low-lying areas  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.