ठाणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:23 AM2020-09-24T06:23:45+5:302020-09-24T06:23:55+5:30

२११ मि.मी. पावसाची नोंद, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली : सखल भागांत साचले पाणी

Heavy rains disrupt life in Thane district | ठाणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

ठाणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मंगळवारी रात्रीपासून ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या चोवीस तासांत २११ मि.मी. पावसाची नोंद झाली तर ठाणे शहरात १९६ मि.मी. पाऊस झाला.


मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या शहरांसह ग्रामीण भागात पावसाचा जोर बुधवारी दिवसभर कायम होता. बुधवारी सायंकाळी महापे परिसरात डोंगरावरून पाण्याचे लोट रस्त्यावर वाहून आल्याने या परिसराला समुद्राचे स्वरूप आले होते. त्यामुळे मुंबईहून डोंबिवली-कल्याणकडे येणारी वाहतूक मंदावली होती. ठाणे रेल्वे स्थानकात अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत १९६ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण २४.१ मिमी, मुरबाड २७.३ मिमी, भिवंडी १७.७ मिमी, शहापूर ८.४ मिमी, उल्हासनगर ५६ मिमी तर अंबरनाथ येथे ३२.९ मिमी पावसाची नोंद झाली.


पालघरमध्ये मुसळधार
पावसाची हजेरी

पालघर : जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रांतही पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात ‘आॅरेंज अ‍ॅलर्ट’ आधीच देण्यात आलेला होता. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात पाठवल्या नाहीत. वसई तालुक्यात नालासोपारा, राष्ट्रीय महामार्ग, वसई पश्चिम परिसरातील सखल भागांत पाणी साचले.


रायगडमध्ये पनवेल तालुक्यात सर्वाधिक पाऊस
च्अलिबाग : मंगळवारी संध्याकाळपासून रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हाजेरी लावली आहे. रात्रभर पडणाºया पावसामुळे काही भागात पाणी साचले होते.
च्सर्वाधिक पाऊस पनवेल तालुक्यात झाला असून त्यानंतर माथेरान, उरणमध्ये पडला तर परिसरातील डोंगराळ सुधागड, महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण समाधानकारक होते.
च्एकूण १४८६.२० मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली आहे. सर्वांत कमी पाऊस पोलादपूर तालुक्यात ८ मि.मी. इतका पडला. नागोठण्याची अंबा नदी धोक्याच्या पातळीपासून तीन मीटर दूर आहे.
च्कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीपासून दोन मीटर दूर आहे. बुधवारी दुपारपर्यंत महाड विभागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई शहराला पावसाने झोडपले : नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मंगळवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला असून शहरातील नेरूळ आणि बेलापूर विभागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहरात सुमारे २२२.८६ मि.मी. पाऊस पडला. बेलापूर गाव, कोकण भवन, सिडको भवन आदी भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या भागातील बाजारपेठेत पाणी शिरल्याने इलेक्ट्रॉनिक, धान्य दुकानातील साहित्य खराब होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

कोयना धरण ओव्हरफ्लो!
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पनवेलमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस : पनवेल : पनवेल परिसराला मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. तब्बल ३०६ मि.मी. अशा रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली. खारघर, पनवेल शहर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल आदी ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. सायन - पनवेल महामार्गावर कळंबोली, ओरियनजवळील मार्ग पाण्यात गेला होता. सायन - पनवेल महामार्गावर खारघर टोल नाका येथे वाहतूककोंडी झाली होती.

Web Title: Heavy rains disrupt life in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस