ठाणे, पालघर, रायगडमध्ये आजही अतिवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 07:31 AM2023-07-21T07:31:58+5:302023-07-21T07:32:22+5:30
गुरुवारी सकाळी ८:३० वाजेता संपलेल्या २४ तासांत मुंबई महानगर प्रदेशात बहुतांश ठिकाणी पावसाने २०० मिलिमीटरचा टप्पा पार केला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात पावसाचे तांडव सुरू असतानाच मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने २१ जुलैसाठी ठाणे, पालघर, रायगड, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
गुरुवारी सकाळी ८:३० वाजेता संपलेल्या २४ तासांत मुंबई महानगर प्रदेशात बहुतांश ठिकाणी पावसाने २०० मिलिमीटरचा टप्पा पार केला. पाच दिवसांसाठी जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
कुठे रेड अलर्ट
२१ जुलै : ठाणे,
पालघर, रायगड, पुणे
कुठे ऑरेंज अलर्ट
२१ जुलै : रत्नागिरी आणि सातारा
२२ जुलै : पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
२३, २४ जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर