दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:22+5:302021-07-22T04:25:22+5:30
वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची ...
वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा व बदलापूरच्या बारवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. भातसा धरणाची पातळी १२२ मीटर असून, पाणीसाठा ५२ टक्के झाला आहे. त्यामुळे १२० मीटर पातळी आणि ४८ टक्के असलेला पाणीसाठा हा दोन दिवसांत पातळी दाेन मीटरने, तर साठा चार टक्क्यांनी वाढला आहे.
तानसा धरणाची पूर्ण संचय पाणीपातळी ४२२ फूट आहे. सध्याची पातळी ४१३.२६ फूट असून, ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर वैतरणा धरणाची एकूण पातळी ५३५.२६ फूट असून, सध्याची पातळी ५१६.४० फूट आहे. यामध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे असाच संततधार पाऊस पडत राहिल्यास हे धरण लवकरच तुडुंब भरून वाहणार आहे. तसेच, एमआयडीसीच्या ३३८.८४ द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या बारवी धरणाची पातळी ६५.६४ मीटर असून, पाणीसाठा ५३ टक्के झाला आहे.