कल्याण-डोंबिवलीत पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:59+5:302021-07-22T04:24:59+5:30
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांना सलग चौथ्या दिवशी बुधवारी पावसाने झोडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पहाटेपासून बरसणाऱ्या पावसामुळे तसेच बकरी ...
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांना सलग चौथ्या दिवशी बुधवारी पावसाने झोडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पहाटेपासून बरसणाऱ्या पावसामुळे तसेच बकरी ईदनिमित्त सुट्टी असल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. परिणामी, रिक्षा व्यवसायावरही परिणाम झाला होता.
सकाळी ११ नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर मुख्य रस्त्यांवर गर्दी दिसून आली. दुपारनंतर मात्र डोंबिवलीतील फडके रोड, मानपाडा रोड, केळकर रोड येथील रस्ते सुनेसुने झाले. रेल्वेस्थानकातही शुकशुकाट पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सकाळी कामावर गेल्यावर स्थानकात गर्दी दिसून आली नाही. दोन दिवसांच्या तुलनेने बुधवारी लोकलसेवा वेळेवर सुरू होती. मात्र, कल्याण व अन्यत्र जाणाऱ्या परिवहन बसगाड्या भरलेल्या होत्या. शहरातील नवनीतनगर भागात जाणाऱ्या बसमध्ये जास्त गर्दी झाली होती. पावसाचा जोर कमी-अधिक होत होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचले तरी त्याचा निचराही काही वेळात झाल्याचे निदर्शनास आले.
--------