ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांंना प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:48 AM2021-09-17T04:48:26+5:302021-09-17T04:48:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहर परिसरात पावसामुळे वाहतुकीस व्यत्यय येत आहे. यामुळे वाहतूक संथगतीने होऊन वाहतूककोंडी होत आहे. ...

Heavy vehicles banned from entering Thane Commissionerate | ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांंना प्रवेशबंदी

ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांंना प्रवेशबंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहर परिसरात पावसामुळे वाहतुकीस व्यत्यय येत आहे. यामुळे वाहतूक संथगतीने होऊन वाहतूककोंडी होत आहे. याशिवाय गणोशमूर्ती विसर्जन मिरवणुकांच्या मार्गावर जनेतच्या सोयीसाठी व वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात येणाऱ्या सर्वप्रकारच्या जडबअवजड वाहनांना गुरुवारपासून १९ सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी केली आहे. यामध्ये घोडबंदर रोडकडून ठाणे शहराकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना गायमुख येथे प्रवेश बंद केला आहे.

याप्रमाणेच भिवंडी, वसई, चिंचोटी मार्गे येणाऱ्या सर्व वाहनांना मालोडी टोलनाका ठाणे ग्रामीण हद्दीत प्रवेश बंद आहे. ती वाडा मार्गे भिवंडीकडे येणाऱ्या वाहनांना अंबाडीनाका येथे ठाणे ग्रामीण हद्दीत प्रवेश बंद आहे. नाशिक पडघा वडपा भिवंडीकडे येणाऱ्या वाहनांना वडपा येथे प्रवेश बंद आहे. शहापूर पडघा मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या वाहनांना पडघा टोलनाका येथे प्रवेश बंद असून, मुरबाड रोड मार्गे कल्याणला येणाऱ्या वाहनांना म्हारळगाव येथे प्रवेश बंद केला आहे.

नवी मुंबईत तळोजा सिमेंट रोडने अंबरनाथ, बदलापूर, कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना उसाटणे फाटा येथे प्रवेश बंद केला आहे. मुंबईहून आनंदनगर चेकनाका मार्गे ठाणे शहरात वाहनांना आनंदनगर चेकनाका येथे प्रवेश बंद आहे. मुंबईतून मॉडेला चेकनाका मार्गे ठाणे शहरात वाहनांना मॉडेला चेकनाका येथे प्रवेश बंद आहे. नवी मुंबई कळंबोली मार्गे मुंब्राकडे येणारी वाहने शीळफाटा, कल्याणफाटा येथे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

प्रवेशबंदी १६ सप्टेंबर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि दुपारी २ वाजेपासून ते १७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ११ पर्यंत आणि दुपारी २ वाजेपासून २० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत वा गणेशमूर्ती विसर्जन संपेपर्यंत अंमलात राहील, असे श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर श्रीकृष्ण कोकाटे यांनी कळविले आहे.

-----------

Web Title: Heavy vehicles banned from entering Thane Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.