कृत्रिम पायांच्या साहाय्याने रु नालीची पुन्हा दमदार पावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 03:52 AM2019-02-03T03:52:27+5:302019-02-03T03:52:48+5:30
डॉक्टर होण्याची स्वप्न पाहिलेल्या ठाण्यातील रुनाली मोरे (१४) हिला ठाण्यात रेल्वे स्थानकात झालेल्या एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले होते.
ठाणे - डॉक्टर होण्याची स्वप्न पाहिलेल्या ठाण्यातील रुनाली मोरे (१४) हिला ठाण्यात रेल्वे स्थानकात झालेल्या एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले होते. गरीब कुटुंबातील रूनाली हिचे वडील अंध असून आई घरकाम करते. त्यातच, घरात मोठी असलेल्या रुनाली हिला कृत्रिम पाय उभे करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी खासदार निधीतून दोन लाख २० हजारांची तरतूद केली. त्यामुळे तिला शनिवारी कृत्रिम पद्धतीने बसवण्यात आलेल्या पायांवर ती चालू लागली आहे. याबाबत खासदारांनी इतके मोठे संकट या मुलीवर येऊन सुद्धा खचून न जाता धाडसाने सामोरी गेली. यासाठी तिचे कौतुक आहे.
रुनाली ही इयत्ता नववीची विद्यार्थीनी. १४ आॅगस्ट २०१८ ला गणिताचा क्लास शोधण्यासाठी ती ठाणे स्थानक परिसरात गेली होती. याचदरम्यान, मैत्रिणीला ट्रेनमध्ये बसून देण्यासाठी दुपारच्या वेळेस रूनाली फलाट क्रमांक पाचवर गेली. पहिल्यांदाच ठाणे स्थानक व तेथील गर्दी पाहून अक्षरश: भांबावून गेली. ती समोरून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा पाहू शकली नाही आणि या धावपळीतच लागलेल्या धक्क्याने ती रेल्वे रु ळावर पडली आणि तिला दोन्ही पाय गमवावे लागले होते.