पूरग्रस्तांसाठी मदत की हसत खेळत फोटोसेशन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:44+5:302021-07-30T04:41:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या थैमानाने लाखो लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यासाठी सर्वच ...

Help for flood victims or a laughing photo session? | पूरग्रस्तांसाठी मदत की हसत खेळत फोटोसेशन ?

पूरग्रस्तांसाठी मदत की हसत खेळत फोटोसेशन ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या थैमानाने लाखो लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यासाठी सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. पूरग्रस्तांच्या अश्रूंनी अख्खा देश हळहळतो आहे. मीरा भाईंदर भाजपनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य निधी जमवला. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या अश्रूंचा विचार न करता हसत हसत फोटोसेशन केल्याची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि त्यांच्याविषयी सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मीरा भाईंदरमधील अनेक भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य व निधी जमविण्यासाठी पदफेऱ्या काढल्या. व्यावसायिक व नागरिकांना आवाहन करत भांडी, कपडे, धान्य, खाद्यपदार्थ, पाणी आदी साहित्यासह निधी गोळा केला. परंतु, पूरग्रस्तांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी काढलेल्या या मदतफेऱ्यांत परिस्थितीचे भान राखण्याऐवजी हसत हसत फोटोसेशन करतानाच अनेकांनी तर चक्क पोझ देत फोटोंची हौस भागवून घेतली. मदतीचा उपक्रम चांगला असला तरी निव्वळ राजकीय प्रसिद्धीचा फायदा न घेता परिस्थितीचे गांभीर्य राजकारण्यांनी राखले पाहिजे, असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Help for flood victims or a laughing photo session?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.