सोशल मीडियावरील माहितीच्या मदतीने ठाणे पोलिसांनी घडविली पिता-पुत्राची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:00 AM2020-12-10T03:00:09+5:302020-12-10T03:00:43+5:30

social media : एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने १३ वर्षीय मुलाची त्याच्या वडिलांशी महिनाभराने भेट घडवून आणली.

With the help of information on social media, Thane police arranged a father-son meeting | सोशल मीडियावरील माहितीच्या मदतीने ठाणे पोलिसांनी घडविली पिता-पुत्राची भेट

सोशल मीडियावरील माहितीच्या मदतीने ठाणे पोलिसांनी घडविली पिता-पुत्राची भेट

Next

ठाणे -  एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने १३ वर्षीय मुलाची त्याच्या वडिलांशी महिनाभराने भेट घडवून आणली. नालासोपाऱ्यातून अचानक बेपत्ता झालेला आपला मुलगा पुन्हा सुखरूप मिळाल्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ झळकले.
सध्या ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमार्फत ‘मुस्कान -९’ ही लहान मुलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गतिमंद विशेष मुलाची त्रोटक माहिती २८ नोव्हेंबर रोजी मिळाल्यानंतर अवघ्या चारच तासांमध्ये त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट घडविण्यात या पथकाला यश आले.

सलीम (नावात बदल) लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर बेकरीत काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी २८ ऑक्टोबर २०२० रोजी त्याला गावावरून नालासोपाऱ्यामध्ये आणले. ते त्याला घरात ठेवून कामाला जात होते. त्याच दरम्यान, तो घरातून अचानक बेपत्ता झाला. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी त्याच्या वडिलांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इकडे १२ नोव्हेंबर रोजी तो कल्याण येथील खडकपाडा पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्याला उल्हासनगर बालसुधारगृहात दाखल केले. दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याची माहिती मिळाली. यामध्ये त्याचा लहानपणीचा जुना फोटो आणि केवळ नालासोपारा एवढीच त्रोटक माहिती होती. त्याआधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकातील पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंगारे आणि पोलीस नाईक प्रमोद पालांडे यांनी त्याचा उल्हासनगरच्या बालसुधारगृहात शोध घेतला. अवघ्या चार तासांत शोध पूर्ण करून सलीमला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. यानंतर पालकांच्या डाेळ्यात अश्रू तरळून त्यांनी पाेलिसांचे आभार मानले.

चुकीच्या, अपूर्ण माहितीमुळे गोंधळ
हरवलेला मुलगा गतिमंद असून त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे वडील रिक्षाने मुंबईत फिरत ४ डिसेंबर रोजी माटुंगा येथे आले होते. त्याचवेळी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने त्यांना मुलाची माहिती दिली. मुलाचा लहानपणीचा जुना फोटो त्यांनी पोलिसांकडे दिला होता. इकडे बालसुधारगृहामध्ये मुलाने चुकीचे नाव दिले. अशी संभ्रमाची माहिती असतानाही या मुलाला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात पथकाला यश आले. आपला मुलगा सुखरूप परत मिळाल्याने मुलाच्या वडिलांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

Web Title: With the help of information on social media, Thane police arranged a father-son meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.