महाडमधील १५० प्राण्यांना ‘पॉज’ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:28+5:302021-07-28T04:42:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : चिपळूण, महाड पुरामध्ये माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांचीही वाताहात झाली. अनेक प्राणी मृत्युमुखीही पडले आहेत. महाडमधील ...

Help pause for 150 animals in Mahad | महाडमधील १५० प्राण्यांना ‘पॉज’ची मदत

महाडमधील १५० प्राण्यांना ‘पॉज’ची मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : चिपळूण, महाड पुरामध्ये माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांचीही वाताहात झाली. अनेक प्राणी मृत्युमुखीही पडले आहेत. महाडमधील पुराचे पाणी आता ओसरत असून, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात बहुतांश प्राण्यांना गॅस्ट्रोची लागण असण्याची शक्यता असते, असे प्लॅण्ट ॲण्ड ॲनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे (पॉज) संस्थापक नीलेश भणगे यांनी सांगितले. दरम्यान, पॉजने आतापर्यंत तेथील १५० प्राण्यांना मदतकार्य केली आहे.

महाड, पाली, लोनेरे, माणगाव व इतर शहरांतील प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था महाडमध्ये सध्या औषधांचा साठा पुरवत आहेत. मुंबई, डोंबिवली-कल्याण परिसरातील प्राणीमित्रांकडून मदत मिळवली जात आहेत. यात ३०० किलो डॉग फूड, ५० किलो कॅट फूड, घोड्यांचे खाद्य, तारपेलिन शिट्स, प्राथमिक उपचारांसाठी लागणारे साहित्य जसे डेटॉल, हळद, बेटाडिन, कापूस, सलाइन आणि इतर लागणारी औषधे जमा करून गेल्या आठवड्यापासून पाठवण्यात आली आहेत. अन्य संस्थेकडून पुन्हा साहित्य आणि औषधांचा साठा सोमवारी पाठवण्यात आला आहे. तसेच, पॉज संस्थेने दुसऱ्यांदा औषधांचा साठा पुरवला आहे. तर, गुरुवारी पुन्हा औषधांचा साठा महाडमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे भणगे यांनी सांगितले.

डोंबिवलीतील पॉजचे कार्यकर्ते महाड येथे मदतकार्य करत आहेत. आजारी प्राण्यांना औषधोपचार देत आहेत. प्राण्यांना वेळेवर उपचार मिळावे त्यासाठी वेगवेगळ्या भागात शिबिरे भरवण्यात आले आहेत.

-------------------

लसीकरणावर भर

या काळात भटक्या प्राण्यांमुळे कोणतीही रोगराई पसरू नये, म्हणून पॉजतर्फे ‘सेवन इन वन’ चे लसीकरण करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी १५० भटक्या कुत्र्यांना लस दिली गेली आहे. ठिकठिकाणी रेबिज लसीकरण करण्यात आल्याचे संस्थेचे टीम सदस्य प्रशांत बुन्नावार यांनी सांगितले.

-------------

आपत्तीच्या काळात मदत

२००४ मधील सुनामी, नेपाळमधील भूकंप, कुर्ग येथील पूर ते आता महाडमधील पूर, अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी पॉज संस्थेतर्फे आपत्ती निवारण केले जाते, असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी म्हणाल्या.

-----------------

Web Title: Help pause for 150 animals in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.