रायगड, रत्नागिरीमधील वादळग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:33+5:302021-05-28T04:29:33+5:30

कल्याण : तौक्ते वादळामुळे रायगड आणि रत्नागिरीमधील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. अनेकांच्या घराचे ...

A helping hand to the storm victims in Raigad, Ratnagiri | रायगड, रत्नागिरीमधील वादळग्रस्तांना मदतीचा हात

रायगड, रत्नागिरीमधील वादळग्रस्तांना मदतीचा हात

Next

कल्याण : तौक्ते वादळामुळे रायगड आणि रत्नागिरीमधील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेले. त्यांना पत्रे आणि आर्थिक मदत तसेच अन्नधान्याचे किट देण्यात आले.

शिवसेनेचे कल्याण पूर्व भागातील नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सिमेंट पत्र्यांचा एक ट्रक भरून पाठविला. तो गरजवंतांना पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. गायकवाड यांनी शिवसेनेचे पदाधिकारी दिलीप दाखीनकर, राहुल पाटील, विजय देशेकर, सागर उटवाल संजय गुजर यांच्या उपस्थितीत ही मदत रत्नागिरी व रायगड या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दिली. विशेष म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ गावात जाऊनही ही मदत पोहोचविण्यात आली.

Web Title: A helping hand to the storm victims in Raigad, Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.