ईडली आणि डोसा बनविणाऱ्यांना मदतीचा हात पुढे, अखिल भारतीय कोळी समाजाची मदत, धारीवीत मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 03:41 PM2020-04-24T15:41:19+5:302020-04-24T15:41:51+5:30
लॉकडाऊनमध्ये ईडली ढोसा तयार करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच त्यांना अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. या संघटनेच्या वतीने धारावीतील १२०० नागरीकांना किराणा सामान देण्यात आले आहे.
ठाणे : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे हातावरील पोट असणाऱ्यांची उपासमार सुरु झाली आहे. त्यातही रस्त्यावर ईडली, ढोसा आदींसह इतर वस्तु तयार करणाऱ्यांचेही हाल सुरु आहेत. त्यामुळे अशा व्यावासयावर उधरनिर्वाह असणाºया धारावीतील १२०० नागरीकांना अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट शाखेचे परेश कोळी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
चेन्नईस्थित असलेले असे अनेक छोटे व्यावासियक मुंबईसह इतर भागात अशा पध्दतीने ईडली ढोसा आदींसह इतर छोटे मोठे पदार्थ तयार करुन व्यावसाय करीत होते. परंतु कोरानामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे या सर्वांचेच उत्पन्नाचे प्रमुख साधन हातून गेले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अशातच आता त्यांना अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट शाखेने मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेचे पदाधिकारी कांती कोळी आणि त्यांचे पुत्र परेश कोळी यांना ही गोष्टी समजल्यावर त्यांनी अशा नागरीकांसाठी मदत करण्याचे निश्चित केले. परंतु हे सर्व नागरीक मुंबईतील धारावी भागात वास्तव्यास होते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन त्यांनी येथील १२०० नागरीकांना तांदुळ, डाळ, तेल, कांदे बटाटे आदींसह इतर प्रमुख साहित्य पाठविले आहे.