चक्रीवादळात नुकसान झालेल्या आदिवासींना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:40 AM2021-05-26T04:40:23+5:302021-05-26T04:40:23+5:30

ठाणे : ताैक्ते चक्रीवादळामुळे आदिवासी भागांत घरांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एम. स्पाेर्ट्स फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तेथील गावांत जाऊन ...

Helping tribals affected by the cyclone | चक्रीवादळात नुकसान झालेल्या आदिवासींना मदत

चक्रीवादळात नुकसान झालेल्या आदिवासींना मदत

Next

ठाणे : ताैक्ते चक्रीवादळामुळे आदिवासी भागांत घरांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एम. स्पाेर्ट्स फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तेथील गावांत जाऊन घरांचे उडालेले छप्पर पुन्हा बसवून दिले. हे काम अजूनही सुरू असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगितले.

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या अनेक आदिवासी पाड्यांवर प्रत्यक्ष जाऊन, पाहणी करून त्यांना हा मदतीचा हात दिला आहे. ठाणे जिल्ह्यात वर्षभरात दीड हजारांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप केले आहे. तेवढ्यावरच न थांबता या संस्थेने कम्युनिटी किचन सुरू करून किचनच्या माध्यमातून सतत ४० दिवस ७०० ते ८०० लोकांना एकवेळचे जेवण पुरवण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात कामधंदे बंद असल्याने बरेचसे मजूर गावी चालत गेले. अशा लोकांसाठी ठिकठिकाणी ताक, पाणी बॉटल आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संस्थेकडून टोपी वाटपही करण्यात आले. पोलीस दिवसरात्र जनतेसाठी कार्यरत असतात. त्यांच्यासाठी झोन ५ मधील आठ पोलीस स्थानकांत पोलिसांना १० हजार पाणी बॉटलचे वाटप संस्थेतर्फे करण्यात आले. दिवसाआड आदिवासी पाड्यात जाऊन जवळपास ५० कुटुंबांना किराणा वाटपही करण्यात आले. ऑनलाईन शिक्षणासाठी संस्थेने शहापूर तालुक्यातील तीन आदिवासी शाळांना ५५ टॅब दिले. तसेच अनेक शाळांत जवळपास आठ हजार वह्यांचे वाटप केले.

----–-------------

Web Title: Helping tribals affected by the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.