अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीचा खून, आरोपीला पोलिसांनी केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 05:56 AM2017-08-25T05:56:20+5:302017-08-25T05:56:26+5:30

साबेगावातील खून प्रकरणाचा पोलिसांनी गुरुवारी उलगडा केला. अनैतिक संबंधांतून हा खून झाला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

Her husband's murder, and the police arrested by the police in connection with immoral relations | अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीचा खून, आरोपीला पोलिसांनी केली अटक 

अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीचा खून, आरोपीला पोलिसांनी केली अटक 

Next

ठाणे : साबेगावातील खून प्रकरणाचा पोलिसांनी गुरुवारी उलगडा केला. अनैतिक संबंधांतून हा खून झाला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
दिवा (पूर्व), साबेगाव येथील कृष्णाई अपार्टमेंटमधील रहिवाशाचा २२ आॅगस्टला खून झाला होता. संदेश यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासामध्ये पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांची चौकशी केली. मात्र, त्यांच्या जबाबातून काहीही निष्पन्न झाले नाही. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या पत्नीचे वर्तन संशयास्पद वाटले. पतीच्या खुनाचा तिच्या मनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसत होते. त्यामुळे शंका येऊन पोलिसांनी चौकशी केली असता तिचे मुरबाड येथील चेतन बाळकृष्ण मुसळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीच्या मूळ गावी जाऊन चौकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रेमसंबंधांत प्रेयसीचा पती अडसर ठरत असल्याने दोरखंडाने गळा आवळून त्याचा खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

फेसबुकवर झाली ओळख
मृताच्या पत्नीशी आरोपीची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. तिचा पती खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याला एक महिना रात्रपाळीमध्ये, तर एक महिना दिवसा काम करावे लागत होते. त्याची पत्नीही ठाण्यात खासगी नोकरी करायची. दीड वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आरोपीचा कल्याणमध्ये फोटोग्राफीचा व्यवसाय असून त्याचे महिलेच्या घरी नियमित येणेजाणे असायचे.

Web Title: Her husband's murder, and the police arrested by the police in connection with immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.