कावळ्यांच्या तावडीतून बगळ्याची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:35+5:302021-09-19T04:40:35+5:30
ठाणे : येथील कोपरीच्या अष्टविनायक चौकामधील झाडावरील घरट्यातून खाली जमिनीवर पडलेल्या बगळ्याच्या पिल्लाचा कावळे पाठलाग करून छळ करीत होते. ...
ठाणे : येथील कोपरीच्या अष्टविनायक चौकामधील झाडावरील घरट्यातून खाली जमिनीवर पडलेल्या बगळ्याच्या पिल्लाचा कावळे पाठलाग करून छळ करीत होते. त्यास चोचीने मारत होते. याकडे लक्ष केंद्रित करून ठाणे महापालिका कर्मचारी भरत मोरे यांनी शनिवारी या पिलाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका करून प्राणी मित्राकडे सुपूर्द केले.
कोपरी परिसरात खाडी किनाऱ्यालगत असलेल्या झाडावर पांढरा शुभ्र बगळ्याच्या पिलाच्या मागे कावकाव करून कावळ्यांची झुंड लागली होती. त्यातील काही कावळ्यांनी या पिल्लाला चोचा मारून त्रास देण्यास प्रारंभ केला होता. कावळ्यांचा मोठा आवाज ऐकून नेमके काय झाले, हे पाहण्यास आलेले येथील मिलिंद पावसकर यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी तातडीने प्राणीमित्र मोरे यांच्याशी संपर्क साधून बगळ्याच्या पिलाची कावळ्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून त्याला जीवनदान दिले. दरम्यान, त्यांनी पकडलेल्या या बगळ्याला ठाण्यातील एसपीसीए प्राणी-पक्ष्यांच्या दवाखान्यात सुपूर्द केले.
.................... .