अंगणवाडीसेविका होणार हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:48 AM2019-05-30T00:48:44+5:302019-05-30T00:48:48+5:30

ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका आता हायटेक झाल्या आहेत. त्यांच्यासह मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या हाती स्मार्ट फोन आले आहेत.

Hi-tech at Anganwadi Service | अंगणवाडीसेविका होणार हायटेक

अंगणवाडीसेविका होणार हायटेक

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका आता हायटेक झाल्या आहेत. त्यांच्यासह मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांच्या हाती स्मार्ट फोन आले आहेत. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तीन हजार ६९५ सेविका आणि १३७ पर्यवेक्षिकांना सीमकार्डसह स्मार्ट फोनचे वाटप झाले आहे. या स्मार्ट फोनमध्ये देण्यात आलेले अ‍ॅप कसे हाताळावे, यासाठी १८० मस्टर ट्रेनरकडून सेविकांना प्रशिक्षण दिल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली. यामुळे अंगणवाडीत कामांचे नोंदणी रजिस्टर कायमचे हद्दपार होणार आहे.
पोषण अभियानांतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्र माची अंमलबजावणी करण्यात येत असून, सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका यांना स्मार्ट फ ोन दिले जात आहेत. केंद्र शासनाकडून अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
>११ प्रकारची रजिस्टर हद्दपार
बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासनाने अंगणवाड्या सुरू केलेल्या आहेत. या अंगणवाडी केेंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच त्यांचे वजन, उंची, त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना ११ प्रकारच्या विविध रजिस्टरमध्ये लिहून ठेवावा लागत होता. मात्र, आता सेविकांना देण्यात येत असलेल्या स्मार्ट फोनमध्ये कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफटवेअर (कॅश) हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे सर्व नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील रजिस्टर संपुष्टात येऊन अंगणवाडीतार्इंचा कामाचा ताणही कमी होणार आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), मुख्य सेविका, कुशल अंगणवाडीसेविका यांना अंबरनाथ येथे २७ ते २९ मे दरम्यान स्मार्ट फोनमधील कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफटवेअर (कॅश) हे नवीन अ‍ॅप कसे हाताळावे, त्यात माहिती कशा प्रकारे भरण्यात यावी, यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती भोसले यांनी दिली.
>अंगणवाडी केंद्र होणार डिजिटल
जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडीसेविकांना आता स्मार्ट फोन दिला जाणार आहे. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांची माहिती अ‍ॅपद्वारे आॅनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांचीही आता डिजिटलकडे वाटचाल सुरू झालेली आहे. मोबाइलमधील अ‍ॅपमध्ये बालकांच्या वैयक्तिक माहितीसोबतच त्याचे लसीकरण कधी झाले, आगामी लसीकरण कधी आहे, याबाबत त्यांच्या पालकांना मेसेज पाठवण्यासाठी बालकांच्या पालकांचेही मोबाइल नंबर घेण्यात येणार आहेत.

Web Title: Hi-tech at Anganwadi Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.