उच्च न्यायालयाने माजी उपमहापौराचा जामीन फेटाळल्याने भिवंडीे काँग्रेसमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 09:26 PM2018-10-12T21:26:44+5:302018-10-12T21:29:06+5:30
भिवंडी : शहरातील राजकीय नेत्याच्या हत्येच्या कटात सामिल असलेल्या काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष अहमद हुसैन मंगरू हुसैन सिध्दीकी हे गेल्या ...
भिवंडी: शहरातील राजकीय नेत्याच्या हत्येच्या कटात सामिल असलेल्या काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष अहमद हुसैन मंगरू हुसैन सिध्दीकी हे गेल्या काही दिवसापासून फरार असुन त्यांनी उच्च न्यायालयांत केलेला जामीन अर्ज फेटाळल्याने शहरातील काँग्रेस पुढाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असुन त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
शहरातील जैतुनपुरा भागात दोन संशयीत फिरत असल्याची खबर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असता पोलीसांनी मो.साजीद निसार अन्सारी व मो, दानिश मो. फारूख अन्सारी या दोन तरूणांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन विदेशी पिस्तोल सापडल्या. त्या बाबत पोलीसांनी सखोल चौकशी केली असता २८ जून २०१८ रोजी त्यांनी मो. अलीम निजामुद्दीन सिध्दीकी उर्फ आलीम बक्कन सरदार याने समदनगर येथील खालीद गुड्डू यांंना मारण्याची दोन लाखाची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यावरून पोलीसांनी आलिम बक्कन सरदार यांस व मो.अश्फाक मंगरू सिध्दीकी या दोघांना अटक केली. पुढील तपासात या कटात सहभागी असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर अहमद हुसैन मंगरु हुसैन सिद्दीकी व काँग्रेस नगरसेवक नसरु ल्लाह अंसारी उर्फ बहात्तर यांच्या मागावर पोलीस असुन ते गेल्या काही दिवसांपासून फरार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येते. त्यापैकी नसरूल्लाह अंन्सारी उर्फ बहात्तर यास पोलीसांनी तडीपार घोषित केले आहे. या आदेशा विरोधात नसरूल्लाह अन्सारी याने कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील अर्ज दाखल केला आहे. या बाबत कोणताही निर्णय झाला नसताना नगरसेवक नसरूल्लाह अन्सारी व माजी उपमहापौर अहमद सिध्दीकी हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांसह राजरोसपणे शहरात फिरत आहे. मात्र त्यास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अटक करीत नाही,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष खालीद शेख यांनी केला आहे. तसेच अहमद हुसैन याने उच्च न्यायालयांत जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज काल गुरूवार रोजी फेटाळला. यामुळे पोलीसांची जबाबदारी वाढली असुन ते आरोपींना कधी अटक करणार आहेत,याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान समदनगर येथे रहाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालीद शेख यांनी पोलीस आरोपीस पकडण्यासाठी हयगय करीत असल्याचा आरोप करीत हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे,अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.