केडीएमसीकडे हाय रीप जॉ क्रशर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:07+5:302021-02-16T04:41:07+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या बेकायदा आणि अतिधोकादायक इमारती तोडण्यासाठी कंत्राटदाराच्या माध्यमातून हाय रीप जॉ क्रशर मशीन आणली ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या बेकायदा आणि अतिधोकादायक इमारती तोडण्यासाठी कंत्राटदाराच्या माध्यमातून हाय रीप जॉ क्रशर मशीन आणली आहे. या मशीनद्वारे बेकायदा बांधकामे आणि धोकादायक इमारती पाडण्याचे काम जलद केले जाणार आहे.
महापालिकेच्या मुख्यालयानजीकच असलेल्या मुस्तफा मंजिल या तळ अधिक तीन मजली धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू आहे. धोकादायक आणि बेकायदा इमारती पाडण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत होता. हाय रीप जॉ क्रशरने आठ मजली इमारत सहज पाडता येऊ शकते. राज्यात ही मशीन केवळ तीनच ठिकाणी आहे. या मशीनचे पुजून अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह उपायुक्त पल्लवी भागवत, उमाकांत गायकवाड, विनय कुलकर्णी, सचिव संजय जाधव, सहायक आयुक्त सुहास गुप्ते, अरुण वानखेडे, प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे आदीच्या उपस्थितीत झाले. नव्या हाय रीप जॉ क्रशरच्या साहाय्याने मुस्तफा मंजिलचे उर्वरित धोकादायक बांधकाम पाडले जात आहे. दुपारपर्यंत निम्मी इमारत पाडून झाली होती.
फोटो-कल्याण-हाय रिप जॉ क्रशर मशीन
--------------------------------
वाचली