ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 797 बाधितांसह सर्वाधिक 51 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:23 PM2020-07-08T20:23:55+5:302020-07-08T20:24:10+5:30
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 471 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 351 तर, मृतांची संख्या 158 इतकी झाली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहे. त्यात बुधवारी दिवसभरात नवीन 1 हजार 797 बाधित रुग्णांची तर, 51 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 हजार 63 तर, मृतांची संख्या 1 हजार 404 झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 471 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 351 तर, मृतांची संख्या 158 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 410 बाधितांची तर, 17 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 11 हजार 705 तर, मृतांची संख्या 449 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 207 रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 279 तर, मृतांची संख्या 269 वर पोहोचला आहे. मीरा भाईंदरमध्ये 175 रुग्णांची तर, चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 808 तर, मृतांची संख्या 174 इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 95 बधीतांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 532 तर, मृतांची संख्या 126 वर पोहोचली.
उल्हासनगर 172 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 260 झाली आहे. अंबरनाथमध्ये 75 रुग्णांची तर, चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 378 तर, मृतांची संख्या 82 झाली आहे. बदलापूरमध्ये 85 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 115 तर, मृतांची संख्या 19 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 107 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 592 तर, मृतांची संख्या 69 वर गेली आहे.