बुधवारी ठाणे जिल्ह्यात नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण सापडले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:24+5:302021-03-04T05:17:24+5:30

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यात आता २ लाख ६७ ...

The highest number of 818 patients was found in Thane district on Wednesday. | बुधवारी ठाणे जिल्ह्यात नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण सापडले.

बुधवारी ठाणे जिल्ह्यात नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण सापडले.

Next

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नव्या वर्षातील सर्वाधिक ८१८ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यात आता २ लाख ६७ हजार ९१० रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा जण दगावल्याने मृतांची संख्या ६ हजार २८६ झाली आहे.

ठाणे शहर परिसरात २३५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६२ हजार ८८८ झाली. शहरात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या १ हजार ३९० वर गेली. कल्याण-डोंबिवलीत २४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत १५३ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यूसंख्या दोन आहे. उल्हासनगरमध्ये २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही. भिवंडीत दोन बाधित असून एकही मृत्यूची नोंद नाही. मीरा-भाईंदरमध्ये ६९ रुग्ण आढळले. अंबरनाथमध्ये २२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत. आता बाधित १९ हजार ६२७ आणि आतापर्यंत ५९५ मृत्यू झाले आहेत.

Web Title: The highest number of 818 patients was found in Thane district on Wednesday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.