केडीएमसी हद्दीत मार्चमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:22+5:302021-03-31T04:41:22+5:30
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, २४ तासांत ५८१ रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे. ...
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, २४ तासांत ५८१ रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या एकूण आठ हजार ४२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आजवरची रुग्णसंख्या ७८ हजार ३१८ वर पोहोचली आहे. यातील ६८ हजार ६३८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २५३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेत १२१, डोंबिवली पूर्वेत २७६, कल्याण पश्चिमेत ३२१, डोंबिवली पश्चिमेला १०२, मांडा-टिटवाळा ५२, मोहना १६ नवे रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, मागील वर्षी जुलैमध्येही १३ हजार ३९२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये १३ हजार ४१८ रुग्ण आढळले. परंतु, चालू असलेल्या मार्चमध्ये आढळलेल्या रुग्णांनी जुलै आणि सप्टेंबर महिन्यांमधील रुग्ण आकडेवारीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. तर मार्चमध्ये आतापर्यंत ४६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
-----------------------------