यंदाच्या मौसमातील सर्वाधिक पाऊस; गेल्या २४ तासांत ठाण्यात २१४ मिमी पावसाची नोंद
By अजित मांडके | Published: July 20, 2023 12:00 PM2023-07-20T12:00:43+5:302023-07-20T12:01:00+5:30
शहरात आजही सखल भागांत पाणी साठले असून त्यातून मार्ग काढताना वाहनचालकाना कसरत करावी लागत आहे
ठाणे - ठाणे शहर आणि परिसरात रात्री पासून पुन्हा पावसाने जोर धरला असून पहाटेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे ३० ठिकाणी झाडे उन्मळूण पडल्याच्या घटना घडल्यात. तर १३ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या आहेत, ८ ठिकाणी पाणी साचले होते.
शहरात आजही सखल भागांत पाणी साठले असून त्यातून मार्ग काढताना वाहनचालकाना कसरत करावी लागत आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत ठाणे परिसरात तब्बल २१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतचा सर्वात दमदार पाऊस कोसळला आहे. मागील वर्षी याच दिवशी सकाळी १४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र अधिकचा पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासन हे २४ तास तत्पर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.