सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून ठाणे बंदची हाक, परिवहन सेवा बंद
By अजित मांडके | Published: December 17, 2022 12:50 PM2022-12-17T12:50:25+5:302022-12-17T12:56:04+5:30
या बंद मुळे अचानक परिवहन सेवेने बंद केल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत होत आहेत.
ठाणे - आज हिंदुत्ववादी संघटनानी ठाणे बंदची हाक दिल्यानंतर ठाण्यातील परिवहन सेवा बंद करण्यात आली आहे. आज सकाळ पासून एकही बस रस्त्यावरून चालली नाही. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात हा ठाणे बंद पुकारण्यात आला आहे.
या बंद मुळे अचानक परिवहन सेवेने बंद केल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत होत आहेत. तसेच या बंदला बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनेही पाठिंबा दिला आहे. यावेळी, ठाणे रेल्वे स्थानाकावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के आणि भाजप आमदार निरंजन डावखरे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांना बंदला पाठिंबा देण्यासंदर्भात आवाहन करताना दिसून आले.
सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांकडून ठाणे बंदची हाक, परिवहन सेवा बंद
— Lokmat (@lokmat) December 17, 2022
व्हिडिओ - अजित मांडके #SushmaAndhare#Thanepic.twitter.com/MbzKWkWDmh