उल्हासनगरातील हिराघाट व इंदिरा गांधी गार्डनचा होणार नूतनीकरण, खासदार श्रीकांत शिंदेकडून दीड कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 05:06 PM2022-01-04T17:06:46+5:302022-01-04T17:10:46+5:30
Ulhasnagar : उल्हासनगरातील बहुतांश गार्डन भग्नाअवस्थेत पडली असून मोजक्याच गार्डनचा विकास करण्यात महापालिकेला यश आले. त्यापैकी हिराघाट परिसरातील भाई साहेब मेहरवान सिंग गार्डन खितपत पडले होते.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : नागरिकांच्या सोयीसाठी हिराघाट येथील भाई साहेब मेहरवान सिंग गार्डन व इंदिरा गांधी गार्डनच्या नूतनीकरणसाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून दीड कोटींचा निधी दिला आहे. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात खासदार शिंदे यांनी निधीची घोषणा केली असून कार्यक्रमाला महापौर लिलाबाई अशान, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी उपस्थित होते.
उल्हासनगरातील बहुतांश गार्डन भग्नाअवस्थेत पडली असून मोजक्याच गार्डनचा विकास करण्यात महापालिकेला यश आले. त्यापैकी हिराघाट परिसरातील भाई साहेब मेहरवान सिंग गार्डन खितपत पडले होते. स्थानिक नगरसेवक राजू इदनानी यांनी पुढाकार घेऊन गार्डन विकासा साठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. सोमवारी गार्डन मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई अशान, विरोधी पक्षनेते राजेश वानखडे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह थारासिंग दरबारचे प्रमुख टिल्लूभाई साहेब, नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जीवन इदनानी यांनी गार्डनच्या विकासासाठी निधीची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केल्यानंतर, शिंदे यांनी हिराघाट येथील गार्डनच्या नूतनीकरणसाठी १ कोटी तर इंदिरा गांधी गार्डन साठी ५० लाखाच्या निधीची घोषणा केली आहे.
शहरातील नाना-नानी पार्क गार्डन, सपना गार्डन, नेताजी गार्डन, लाललोई गार्डन अशी मोजकीच गार्डन विकसित करण्यात महापालिकेला यश आले. इतर गार्डन असीच खितपत पडून असून त्यांच्यावर भूमाफियाची नजर आहे. यापैकी हिराघाट येथील भाई साहेब मेहरवान सिंग गार्डन विकसित करण्यासाठी स्थानिक नगरसेवक जीवन इदनानी यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. सोमवारी गार्डन मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून हिराघाट येथील गार्डन व इंदिरा गांधी गार्डन नूतनीकरण साठी दीड कोटींचा निधी मिळविण्यात यशस्वी झाले. लवकरच दोन्ही गार्डनचे नूतनीकरण कामाला सुरुवात होणार असल्याचे संकेत इदनानी यांनी दिले. इतर खितपत पडलेल्या गार्डनचेही नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.