ऐतिहासिक काळातलाव परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:16 AM2018-02-08T03:16:05+5:302018-02-08T03:16:13+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केडीएमसीने काळातलाव परिसरात उभारलेल्या भव्य स्मारकाच्या परिसरातील पायवाटेवर सध्या सांडपाणी वाहत आहे.

Historical era of waste washed in the area! | ऐतिहासिक काळातलाव परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी!

ऐतिहासिक काळातलाव परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी!

Next

कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केडीएमसीने काळातलाव परिसरात उभारलेल्या भव्य स्मारकाच्या परिसरातील पायवाटेवर सध्या सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात फिरायला येणाºया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्मारकाच्या ठिकाणचे नसून बाजूकडील इमारतीमधील हे सांडपाणी असल्याचे बोलले जात असले, तरी मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त अन्य छोट्या निर्माण झालेल्या प्रवेशद्वारांमुळे काळातलाव परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्याकडे केडीएमसी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेचे दुर्लक्ष झाले आहे.
काळातलाव परिसरात बाळासाहेबांचा २२ फुटी भव्यदिव्य पुतळा आहे. बाळासाहेबांचे कल्याण शहरावर विशेष प्रेम होते. या शहरात त्यांचे काही काळ वास्तव्यही होते. नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कल्याणमध्ये स्मारक उभारण्याचा ठराव केडीएमसीच्या २०१३ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. या स्मारकासाठी एक कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. या स्मारकाचे उद्घाटन जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आले. बाळासाहेबांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारणारी केडीएमसी ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका आहे. परंतु, केडीएमसीचे या स्मारकाकडे आणि एकंदरीतच काळातलावाकडे दुर्लक्ष झाले आहे.
>सुरक्षेकडेही विशेष लक्ष द्यायला हवे
आम्ही दररोज येथे सकाळी फेरफटका मारायला येतो. पण, या सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तलावाची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे नागरिक मंदार घाटे यांनी सांगितले.
>समस्या निकाली काढली
जे सांडपाणी वाहत होते, ते शेजारील इमारतीमधील होते. स्मारकाच्या ठिकाणी कोणतीही समस्या नाही. वाहणाºया सांडपाण्याची समस्या निकाली काढली आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराशिवाय अन्य ठिकाणचे जे प्रवेशद्वार आहेत, त्यातील काही जागा खाजगी मालकीच्या आहेत. आजूबाजूला वस्तीही आहे. तरीही, काही ठिकाणी गेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. निधी उपलब्ध होताच ती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे नगरसेवक सुधीर बासरे यांनी सांगितले.

Web Title: Historical era of waste washed in the area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे