ठाण्यात उलगडला अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडियाचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:44 AM2021-08-30T11:44:06+5:302021-08-30T11:44:21+5:30
ठाण्यात प्रथमच "अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया" उभारण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी केबीपी महाविद्यालयात उदघाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सीए या क्षेत्राकडे विद्यार्थी वळत असून या क्षेत्रात एकही जण बेरोजगार नसल्याचे वक्तव्य आयसीएआय वेस्टर्न इंडिया रिजनल कॉउन्सिलचे चेअरमन मनीष गाडीया यांनी वक्तव्य केले.
ठाण्यात प्रथमच "अकाउंटिंग म्युझियम ऑफ इंडिया" उभारण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी केबीपी महाविद्यालयात उदघाटन झाले. यात प्रथमच ४४ फुटांची वॉल ऑफ अकाउंटनसीचा तयार करण्यात आली. या भिंतीवर अकाउंटनसीचा इतिहास उलगडण्यात आला. यावेळी आयसीएआय वेस्टर्न इंडिया रिजनल कॉउन्सिलचे चेअरमन मनीष गाडीया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
त्याचबरोबर यावेळी रिजनल कॉउन्सिल सदस्य कमलेश साबू,वेस्टर्न इंडिया रिजनल कॉउन्सिलच्या माजी अध्यक्षा प्रीती सावला, कार्यक्रमाचे समन्वयक सीए योगेश प्रसादे, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. संतोष गावडे उपस्थित होते.