ठाणे स्थानकात उलगडला जातोय रेल्वेचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:44 AM2019-09-18T00:44:54+5:302019-09-18T00:45:02+5:30
ठाणे स्थानकात रेल्वे प्रशासनाकडून व्हिडीओद्वारे नागरिकांना देशभरातील ऐतिहासीक रेल्वेचे दर्शन घडवले जात आहे.
ठाणे : ठाणे स्थानकात रेल्वे प्रशासनाकडून व्हिडीओद्वारे नागरिकांना देशभरातील ऐतिहासीक रेल्वेचे दर्शन घडवले जात आहे. रेल्वेमध्ये दिवसेंदिवस होणारे आणि बदल पुढे ती आणखी सुसज्ज आणि आकर्षित बनत चालली असली तरी ती १००-१५० वर्षांपूर्वी दिसायला कशी होती? याची उत्सुकता अनेकांना आहे. मात्र, तीर उत्सुकता संपली असून आता रेल्वेचा हा इतिहास व्हिडीओ आणि फोटोंद्वारेच दिला जात असून तो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
आशिया खंडातील पहिली रेल्वे धावल्याचा मान ठाणे स्थानकाला मिळाला आहे. १८५३ मध्ये ठाणे ते वाडीबंदर अशी पहिली रेल्वे धावली. या रेल्वेमध्ये अनेक बदल झाले असले तरी या मार्गावरून धावणारी पहिली रेल्वे कशी होती, त्याचबरोबर पहिले ठाणे स्थानक आणि वाडीबंदर दरम्यानचा मार्ग कसा होता. याची उत्सुकता आजच्या पिढीला आहे. त्यांची ही उत्सुकता रेल्वेने दूर करतानाच देशभरातील त्या काळातील रेल्वेपासून रूळ, स्थानके, पूल, पहिल्या वर्गाचे डबे, मेल,एक्स्प्रेस कशा होत्या याची सचित्र माहिती उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहा वरील तिकीट घराजवळ एका मोठ्या स्क्रि नवर याबाबतची माहिती,त्यांचे चित्र आणि व्हिडीओ दाखविले जात आहे. यामध्ये १९२५ मधील नेरळ ते माथेरान या मार्गावर धावलेली पहिली रेल्वे बस, पहिली लोकल दाखविली जात आहे. तर, ब्रिटिशांनी ठाणे रेल्वे स्थानक ते मुंबईतील वाडीबंदर या मार्गावर पहिली रेल्वे सेवा सुरू झाली. दरम्यान, रेल्वे मार्ग टाकणे, आवश्यक ठिकाणी रेल्वे पूल बांधणे, स्थानके तयार केले. पण याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नाही, ती दिली जात असल्याने पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
>कोणती माहिती दिली जात आहे
माथेरान मधील मिनी ट्रेन, १९१० मधील पुणे स्टेशन तसेच येथे थांबलेली रेल्वे, बोर घाटातील वाफेच्या इंजिनसह रेल्वे, आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, माथेरान रेल्वे स्टेशन, चेन्नई मधील १८७१ मधली रेल्वे, १९२५ ची मुंबईतील पहिली लोकल, तेव्हाचा प्रथम श्रेणीचा डब्बा, व्हिटी वरून सुटलेली पहिली लोकल, ठाणे रेल्वे पुलावरील पहिली ट्रेन, १८५३ मधील भायखळा स्टेशन माहिती व्हिडीओद्वारे दाखवली जात आहे.