मास्क न लावणाऱ्या १८१ व्यक्तींना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:53+5:302021-07-09T04:25:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसी हद्दीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, बुधवारी कोरोनाचे १९९ रुग्ण आढळून आले. केडीएमसी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, बुधवारी कोरोनाचे १९९ रुग्ण आढळून आले. केडीएमसी प्रशासन वारंवार कोरोना नियमांचे पालन करा, असे सांगत असले तरी त्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या सहा दिवसांत सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडावर मास्क अथवा कापड परिधान न करणाऱ्या १८१ व्यक्तींवर कारवाई करून ९० हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाटेचा इशारा आरोग्य यंत्रणांनी दिला गेला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक नागरिक कोरोनाबाधित झाले, तसेच मृत्यूचे तांडव पाहायला मिळालेले असतानाही नागरिकांना आपल्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचे मनपाच्या सुरू असलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याचे उघड झाले आहे. जूनमध्ये मास्क परिधान न केलेल्या एक हजार ८१२ नागरिकांकडून नऊ लाख सहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा बुधवारी वाढलेला आकडा पाहता चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. पण, त्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीने केले आहे.
-------------------