कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या दाेन संकुलांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:43+5:302021-08-21T04:45:43+5:30

मीरा रोड : कायद्याने ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक असूनही कचरा वर्गीकरण न करणाऱ्या, तसेच पालिकेने ताे ...

Hit the non-waste sorting packages | कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या दाेन संकुलांना दणका

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या दाेन संकुलांना दणका

Next

मीरा रोड : कायद्याने ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक असूनही कचरा वर्गीकरण न करणाऱ्या, तसेच पालिकेने ताे घेतला नाही म्हणून तो रस्त्यावर टाकणाऱ्या मीरा रोडच्या दोन उच्चभ्रू संकुलावर कारवाई करून शुक्रवारी त्यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचा पदभार उपायुक्त अजित मुठे यांनी घेतल्यानंतर आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण न करणारे व रस्त्यावरील कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली. दोन दिवसांपासून कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर त्यांचा कचरा न उचलण्यासह त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. वेस्टर्न हॉटेल जवळील जेके इन्फ्रा व जेपी इन्फ्रा या सोसायट्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण न करताच कचरा देऊ केला. पालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून देण्यास सांगितले आणि कचरा नेण्यास नकार दिला. त्यानंतर या संकुलातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्याने शुक्रवारी उपायुक्त अजित मुठे यांनी तत्काळ संबंधित सोसायट्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांना दिले. त्यानुसार राठोड यांनी संबंधित दोन्ही सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी २५ हजार रुपये इतका दंड दोन्ही सोसायट्यांकडून वसूल करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे कायद्याने प्रत्येकाला बंधनकारक आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावणे जिकिरीचे

मीरा-भाईंदर महापालिका ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन सातत्याने अनेक वर्षांपासून नागरिकांना करत आहे. मध्यंतरी कचरा वर्गीकरण केला नसेल तर तो न उचलण्याची पालिकेने भूमिका घेतली. मात्र, ठोस कारवाई केली जात नसल्याने अनेक संकुलांनी कचरा वर्गीकरण न करताच देणे सुरू ठेवले. शहरातील झोपडपट्टी, गावठाण, व्यावसायिक आदींकडून कचरा वर्गीकरण करून देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कचरा वर्गीकरण होत नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे जिकिरीचे बनले आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या, ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायट्या, त्याचप्रमाणे परिसर अस्वच्छ करणारे व्यावसायिक यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीतील कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा देण्याचे आवाहन उपायुक्त मुठे यांनी केले आहे.

Web Title: Hit the non-waste sorting packages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.