ठाणे जिल्हा बँकेवर पुन्हा हितेंद्र ठाकूर समर्थक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:47+5:302021-04-13T04:38:47+5:30

ठाणे : राज्यातील सहकार धुरिणांचे लक्ष लागून असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेवर आमदार हितेंद्र ठाकूर यांचे समर्थक ...

Hitendra Thakur supporter again on Thane District Bank | ठाणे जिल्हा बँकेवर पुन्हा हितेंद्र ठाकूर समर्थक

ठाणे जिल्हा बँकेवर पुन्हा हितेंद्र ठाकूर समर्थक

Next

ठाणे : राज्यातील सहकार धुरिणांचे लक्ष लागून असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेवर आमदार हितेंद्र ठाकूर यांचे समर्थक राजेंद्र पाटील यांची पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर भाजपाने यावेळी विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांच्याऐवजी कल्याण येथील अरुण पाटील यांना संधी दिली असता तेही उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची ही निवड २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठी झाली, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्हा बँकेची साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. बँकेचे उत्कृष्ट कामकाज असतानाही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अपप्रचार केला होता. मतदारांनी त्याची दखल घेऊन आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवून सेवेची संधी दिली, असे पुन्हा अध्यक्षपदी निवड झालेले राजेंद्र पाटील यांनी सांगितले. येथील कांती विसरीया सभागृहात ही निवडप्रक्रिया पार पडली. यावेळी सभागृहात सत्ताधारी सहकार पॅनलचे १८ संचालक उपस्थित होते. तर प्रतिस्पर्धी महाविकास परिवर्तन पॅनलचे दोन संचालक सभागृहात उपस्थित होते.

बँकेच्या २१ संचालकांपैकी सोमवारी २० संचालक या सभागृहातील उपस्थित होते. मात्र, पालघरचे काँग्रेस पुरस्कृत मधुकर पाटील काही अपरिहार्य कारणांमुळे सभागृहात उपस्थित राहिले नाही. उपस्थिताना अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी वेळ दिली असता या दरम्यान राजेंद्र पाटील यांनी अध्यक्षपदासाठी व अरुण पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या विरोधात एकही नामनिर्देशनपत्रे दाखल झाले नाही. यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी केली.

----------

Web Title: Hitendra Thakur supporter again on Thane District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.