सीकेपीच्या कर्जदारांच्या संपत्ती ताब्यात घेणार, डोंबिवलीतील मेळाव्यात खातेदार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:38 PM2017-11-02T16:38:34+5:302017-11-02T16:39:07+5:30
रिझर्व बँकेच्या अनुमतीने एकरकमी कर्ज परत फेड योजना सीकेपी बँकेनही आणली होती. त्यात काही रक्कम वसूल झाली परंतु मोठे थकीत कर्जदारांनी त्या योजनेत कर्ज फेड केली नाही.
डोंबिवली: रिझर्व बँकेच्या अनुमतीने एकरकमी कर्ज परत फेड योजना सीकेपी बँकेनही आणली होती. त्यात काही रक्कम वसूल झाली परंतु मोठे थकीत कर्जदारांनी त्या योजनेत कर्ज फेड केली नाही. त्यामुळे आता मोठे कर्जदार आणि त्याचे कर्ज जामीनदारांच्या संपत्ती ताब्यात घेणे, त्या मालमत्तेचा लिलाव, विक्री करून कर्ज वसुली केली जाणार आहे. ज्यांनी संपत्ती दाखवून कर्ज घेतले आणि परस्पर संपत्ती विकून बँकेची फसवणूक केली अश्या कर्ज बुडव्यांची चौकशी करुन त्यातील दोषींवर कडक कारवाई केली जावी असा ठराव सीकेपी बँकेच्या मेळाव्यात पारीत करण्यात आला.
सीकेपी बँक संचालकांचेतर्फे भागधारक,ठेवीदार आणि खातेदारांचा मेळावा बुधवारी डोंबिवलीत होता. त्यावेळी संचालक भाऊसाहेब चौधरी व मुणाल ठोसर यांनी वरील ठराव मांडला, सगळयांनी तात्काळ त्यास संमती दिली. त्यावेळी व्यासपीठावर बँकेचे हंगामी अध्यक्ष राजेंद्र फणसे,प्रभाकर वैद आदींसह अधिकारी उपस्थित होते. बँकेचे काळजीवाहू अध्यक्ष फणसे म्हणाले की, बँकेच्या मागील संचालक यांनी कर्जवाटप करतांना अनेक घोटाळे केलेत त्यामुळे २०१२साली शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून सुभाष पाटील यांची बँकेवर प्रशासक नेमणूक केली, मात्र त्याआधी असलेल्या ठेवी प्रशासकीय काळात कमी झाल्याने कजार्ची वसूलीकडे लक्ष न दिल्याने बँक डबघाईला आली. हे रिर्झव्ह बँकेच्या लक्षांत येतांच बँकेवर १ मे २०१४ सालापासून कडक निर्बंध लावले.
२०१५मध्ये निवडणूक होऊन संचालक मंडळाच्या हातात कारभार आला पण आधिचे कर्ज वाटपात घोटाळे झाले आहेत ते त्याची चौकशी सुरू असून त्यातून मार्ग काढून जास्तीत जास्त कर्ज वसूलीवर भरदेत आहोत रिर्झव्ह बँकेच्या निदेर्शानुसार कर्ज वसूली बरोबर बँकेचे भागभांडवल वाढवावे लागणार असल्याचे आवाहन चौधरी यांनी केले.