जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होळी

By admin | Published: March 17, 2017 05:45 AM2017-03-17T05:45:44+5:302017-03-17T05:45:44+5:30

नाच-गाणी, खेळ, मनोरंजन, पारितोषिक, चित्रपट आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घेत सोपारा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी होळीचा सण साजरा केला

Holi with the students of Zilla Parishad School | जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होळी

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होळी

Next

वसई : नाच-गाणी, खेळ, मनोरंजन, पारितोषिक, चित्रपट आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घेत सोपारा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी होळीचा सण साजरा केला. सेव्हन आर्टस ग्रुपने रविवारी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
सोपारा गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी आणि गुजराथी माध्यमाचा शाळेत गरीब कुुटुंबातील १६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गरीब परिस्थितीमुळे शिक्षणाशिवाय चंगळ आणि मनोरंजनाच्या साधनांशी त्यांचा दूरवर संबंध येत नाही. म्हणून या विद्यार्थ्यांसाठी सेव्हन आर्टस ग्रुप नियमितपणे विविध उपक्रम राबवत असते. यंदा होळीनिमित्ताने ग्रुपचे अध्यक्ष निरव शुक्ला, मोहक पाटील, राजू भुर्के आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत गेले. विद्यार्थ्यांना चक्रेश्वर तलाव बगीच्यात फिरवण्यात आले. अल्पोपहार झाल्यानंतर शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते आणि पालकांनी स्नेहभोजन घेतले. त्यानंतर भेटवस्तू देऊन गौरव केला. (प्रतिनिधी)

Web Title: Holi with the students of Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.