मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; रायगडमधील 'या' तालुक्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:07 AM2024-07-25T10:07:42+5:302024-07-25T10:10:48+5:30

Rain Update : आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे.

Holiday declared for schools in Thane due to heavy rain Examinations of the University in Raigad have been cancelled | मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; रायगडमधील 'या' तालुक्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; रायगडमधील 'या' तालुक्यातील विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

Rain Update : आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. 

आज सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मुंबई विद्यापीठानेही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलदपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड येथील शाळांना सुट्टी आणि मुंबई विद्यापीठानेही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

लोकलवर परिणाम

मुंबईत बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या ६-७ तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, गोरेगाव, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, कुर्ला आणि घाटकोपर भागात काही प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या तुफान पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे असाच पाऊस सुरु राहिल्यास रेल्वेची वाहतूक काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३-४ तासांत मुंबईच्या काही भागात ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच येत्या काही तासांत दादर, वरळी, वांद्रे, महालक्ष्मी, कुर्ला, बीकेसी, चेंबूर, घाटकोपर येथे सर्वात जास्त पाऊस पडणार असून ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. 

आणखी काही दिवस मुसळधार

मुंबईत पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 'स्कायमेट'ने पुढील दोन आठवडे पडणाऱ्या अंदाज वर्तवला आहे. २६ आणि २७ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासहीत मुंबईमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे. २८ जुलै रोजी पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे. तर २९ जुलै म्हणजेच सोमवारी रविवारच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० जुलैपासून पुढील ९ दिवस जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांना पहायला मिळेल असा अंदाज आहे. ३१ जुलै रोजीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Holiday declared for schools in Thane due to heavy rain Examinations of the University in Raigad have been cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.